७५. ३० सेकंदांत ३० लाख कमवा
एकाच कामावर लक्ष केंद्रित करून प्रॅक्टिस केल्यास प्रचंड यश मिळू शकते. ट्याचे जबरदस्त उदाहरण महान चित्रकार पाबलो पिकासो यांचे देता येईल. पाबलो पिकासो यांना एक महिला भेटली. तिच्या खूप विनंतीवरून पाबलो पिकासो यांनी ३० सेकंदांत एक चित्र काढले. त्यावर सही केली व सांगितले, याची किंमत ३० लाख रुपये आहे. त्या महिलेचा विश्वास नव्हता म्हणून तिने ते चित्र अनेकांना दाखविले. तेव्हा खरोखरच त्याची किंमत ३० लाख रुपये होती. पुन्हा ती पिकासोला भेटली व म्हणाली, आजपासून तुम्ही माझे गुरू. मला ३० सेकंदांत ३० लाखांचे चित्र काढायला शिकवा. त्यावर पाबलो पिकासो म्हणाले, बाई यासाठी मी ३० वर्षांपासून रोज रोज घासतोय, म्हणजे प्रॅक्टिस करतोय. म्हणूनच मी आता ३० सेकंदांत ३० लाखांचे चित्र काढू शकतो. तुझी तयारी आहे का? याला म्हणतात प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. प्रॅक्टिसशिवाय असे यश मिळू शकत नाही. तुम्हीही तुमच्या क्षेत्रात प्रॅक्टिस करा व यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
