९. ध्येय निश्चिती करा.

९. ध्येय निश्चिती करा.

उंच शिंक्यावर ठेवलेले लोणी प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे सर्व बाळगोपाळ एकत्र येऊन एकावर एक उभे राहून ध्येयरुपी हंडीपर्यंत पोहचत असत आणि सर्वजण मिळून ते लोणी चाखत असत. तसं तुम्हाला सर्व रयत सोबत घेऊन ध्येय प्राप्त करायचे आहे आणि या स्वराज्याचा उपभोग रयतेला सुद्धा द्यायचा आहे. याचे प्रतीक म्हणजे श्रीकृष्णाचे मोरपिस होय. श्रीकृष्णाला आपण आपले पूर्वज म्हणून आदर्श म्हणून स्वीकारताना हे मोरपिस हेही आठवण करून देतील की केवळ तुम्ही स्वतः राजा व्हायचे नाही तर इतरांना देखील राजा बनायला मदत करायची आहे. जसं श्रीकृष्णाने पांडवांना राजा केलं, उग्रसेनाला राजा केलं. सहदेवाला राजा केलं. बलरामाला राजा केलं. तसं तुम्ही देखील इतरांना राजा होण्यासाठी मदत करायला पाहिजे तुमच्या वडिलांनी शहाजीराजांनी कर्नाटक आणि दक्षिण भारतात अनेक हिंद राजांना अभय देऊन त्यांचे रक्षण करून त्यांचे राजेपण कायम केले. तसेच तुम्हाला आता दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात अनेक हिंदू लोकाना. सरदारांना राजा होण्यासाठी मदत करण्याचे ध्येय ठेवायला पाहिजे. श्रीकृष्णाप्रमाणेच तुम्ही देखील रणकुशल व्हायला पाहिजे. नीती आणि युद्धनिती यात जसा श्रीकृष्णाचा कोणी हात धरू शकले नाही तसेच तुम्ही घडले पाहिजेत. तुमच्या सैनिक आणि रयतेमधून कोणी मरता कामा नये. आणि तुमच्यावर चालून येणारा कोणीही शत्रू जिवंत परत नाही गेला पाहिजे, हीच कृष्णनिती तुम्ही कायम अजमावली पाहिजे. रयतेचा राजा आणि शत्रूचा कर्दनकाळ हीच तुमची ओळख असावी म्हणूनच तुमच्या मुकुटात मोरपीस धारण केले जाईल.

आपणाला शिवाजी महाराजांच्या मुकुटात जिजाऊंच्या या इच्छेप्रमाणे कायम मोरपिस लावलेले दिसते. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी रयतेचे पालन करत शत्रूचा निःपात करत स्वराज्य निर्माण करून राज्याभिषेक केला, तेव्हाच्या मुकुटातही राजमाता जिजाऊ यांनी स्वतःच्या हातांनी मोरपिस लावले आणि मगच राज्याभिषेक संपन्न झाला. याला म्हणतात ध्येय निश्चिती ते ध्येयप्राप्ती. आणि हा क्षण येईपर्यंत राजमाता जगल्या आपलं ध्येय पूर्ण केलं. आपल्या मुलाला शून्यातून छत्रपती केलं आणि मग बारा दिवसांनी आपला देह ठेवला. १७ जून १६७४ पाचाड. राजमाता जिजाऊ यांची शिकवण अंमलात आणताना महाराजांनी बांधलेल्या सर्व १११ किल्ल्यांवर शिवमंदिरे बांधली आणि स्वराज्यात प्रत्येक गावात एक विठ्ठल मंदिर बांधले. या मंदिरात जाणाऱ्या वारकऱ्यांचीच मुले पुढे स्वराज्याचे धारकरी बनले. मावळे बनले. आपल्या रयतेत समानतेची भावना जोपासताना महाराजांनी याची पण दक्षता घेतली की जसे मुगल करायचे, मुस्लीम राजे करायचे तसा आपल्या रयतेत कधी भेदभाव ना केला ना कोणाला करू दिला. आपणही आपल्या आयुष्यात ध्येय प्राप्त करताना त्यात सोबत असणारी सर्व माणसे मग ती व्यवस्थापक कर्मचारी ते ग्राहक असे सर्व लोकांना आपल्या ध्येयाबाबत प्रेरित करून त्यांना सोबत घेतले पाहिजे. आणि वेगाने आपला ध्येयाकडील प्रवास करून कमीतकमी वेळेत आपले ध्येय प्राप्त केले पाहिजे.

 

error: Content is protected !!