७७.सर्वात महत्त्वाची गुंतवणूक कोणती ?

७७.सर्वात महत्त्वाची गुंतवणूक कोणती ?

आपण सर्वजण काम करतो ते उज्ज्वल भवितव्यासाठी. गुंतवणूक करतो आतीही उज्वल भवितव्यासाठी. मग सर्वात जास्त रिटर्न मिळण्यासाठी जीवनात कोठे गुंतवणूक करावी? लोक म्हणतील प्रॉपर्टीमध्ये. जाणकारांच्या मते २०३० सालापर्यंत रियल इस्टेट मार्केट एक ट्रिलियन डॉलर होणार आहे. काही लोक म्हणतील शेअर्स, स्टॉक, बॉण्ड, इन्शुरन्स, गोल्ड, सिल्व्हर, डायमंड या धातूंमध्ये का कमोडिटी मध्ये. हुशार लोक सांगतील मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक करा; परंतु यशस्वी व बुद्धिजीवी लोक सांगतील सर्वात जास्त कंपाउंडिंग रिटर्न्स तुम्हाला हवे असतील तर स्वतःमध्ये गुंतवणूक करा. स्वतःला सतत यशस्वी व अपग्रेड ठेवण्यासाठी ज्ञान, कौशल्य व अनुभव मिळण्यासाठी स्वतःवर खर्च करा. ज्ञानासाठी, पुस्तकांसाठी केलेला खर्च हा खर्च नसून गुंतवणूक आहे. जी तुम्हाला सर्वात जास्त रिटर्न्स देत राहील.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!