८१.कष्टाला पक्के पण हिशोबाला कच्चे

८१.कष्टाला पक्के पण हिशोबाला कच्चे

कोणत्याही णत्याही व्यवसायाचे अकाउंट्स म्हणजे त्या व्यवसायाचे हृदय असते. त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर तुम्हीं कितीही कष्ट केले तरी धंदा बंद पडू शकतो. म्हणून पाटलांसारखी दुकानदारी करू नका. प्रत्येक व्यावसायिकाने Monthly business analysis करणे अत्यंत गरजेचे असते. नसता वर्षाच्या शेवटी चुका समजून काहीच उपयोग होत नाही. हुशार व यशस्वी उद्योजक दर महिन्याच्या शेवटी स्टॉक इन्व्हेंटरी, खरेदी, विक्री, उधारी तपासून दर महिन्याचा नफा तोटा काढतो. त्यावरून पुढील महिन्याची रणनीती ठरवतो. तुम्ही वायफट खर्च कमी करा. झालेल्या चुका शोधून त्यावर उपाययोजना करा. त्याचप्रमाणे ROI म्हणजे Return on Investment म्हणजे गुंतवणुकीतून किती पैसे मिळतात, हे तपासा. स्वतःसाठी व्यवसायातून जर पैसे घेतले तर त्याचाही हिशोब ठेवा. पैसे कधी व कुठे खर्च करायचे हे जर तुम्ही शिकला नाहीत तर तुम्ही कमवलेले पैसे कुठे गेले हे तुम्हाला कधीच
कळणार नाही. Monefy सारखे नवीन अॅप द्वारे उत्पन्नाचा व खर्चाचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवल्यास तुमचे धन वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही कष्टाला जसे पक्के रहाता तसेच हिशोबालाही पक्के राहा व व्यवसायात यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!