८०.चांगले कर्म करा
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भुमा ते सङ्गो स्त्वकर्मणि ।। हा भगवद्गीतेतील श्लोक लक्षात घेतला तर माणसाच्या जीवनात कर्माला सर्वोच्च स्थान आहे, हे लक्षात येईल. उचित कर्म करीत राहवे; पण त्या कर्मातून फळ मिळावे याची अपेक्षा करू नये. मनात कसलाही हेतू न ठेवता कर्म करीत राहवे, असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. महान हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक तथा अभिनेते मनोजकुमार यांच्या एका हिंदी चित्रपटात जैसा करम करेगा वैसा फल देगा
भगवान । यह है गीता का म्यान, यह है गीता का म्यान असे एक गाणे पणा आहे. अर्थात ते ऐहिक, प्रापंचिक जीवनाबद्दल आहे. मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो. म्हणूनच म्हणतात, कर्म तेरे अच्छे हैं तो तकदीर तेरी दासी है। और नियत तेरी अच्छी है तो घर मे मथुरा काशी है। मी गरीब म्हणून जन्माला आलो, कारण ते माझ्या हाती नव्हते. परंतु मी गरीब म्हणून मरणार नाही. कारण ते कर्म फक्त माझ्याच हाती आहे. म्हणून सर्वोत्तम कर्म करा व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
