८७.वारेन बफेची यशस्विता
जगातील सर्व अरबपती पैकी ८० टके हे गरिबीतूनच श्रीमंत आलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वॉरेन बफे. ते आज ९१ वर्षांचे असले तरीही दररोज ५०० पानांचे वाचन करतात. लहानपणी गरिबीमुळे वर्तमानपत्र वाटून एकदाच जेवण मिळत असे. म्हणूनच श्रीमंतीची आस धरून १३ व्या वर्षी इन्कम टॅक्स भरला. १६ व्या वर्षी जाहीर केले की ३०व्या वर्षी मी करोडपती झालो नाही तर उंच इमारतीवरून उडी टाकून जीव देईन.
ते म्हणतात, ज्ञान हाच यशाचा मूळ मंत्र आहे. Learning = Earning या मंत्रातून पॉवर ऑफ कंपाउंडिंगचा चा फॉर्म्युला वापरून ८३८ रुपयांच्या गुंतवणुकीतून ७ लाख करोड कमावले. वॉरेन बफे म्हणतात चांगला बिजनेस मैंन हा चांगला इन्व्हेस्टर असतो. ते म्हणतात उधारीचा धंदा करू नका. क्रेडिट कार्ड घेऊ नका. भोक पडलेल्या नावेला दुरुस्त करण्या ऐवजी नवीन नाव विकत घ्या, तुमच्या व्यवसायात २० टक्के वाढ होत नसेल तर धंदा बदला.
त्यांच्यासोबत जेवण घ्यायचे असेल तर ३५ करोड ते घेतात व चॅरिटेबल फाउंडेशनला दान देतात. आतापर्यंत त्यांनी ३२०० कोर्टीचे दान दिले असून त्यांच्या मृत्यूनंतर ते ९९ टक्के संपत्ती दान देणार आहेत. साधे घर, साधा मोबाईल, साथी कार, साधे कपडे वापरणारे पण उच्च विचाराचे वारेन बफे एक ऋषितुल्य व उद्योग व्यवसायासाठी आदर्श आहेत. त्यांचा आदर्श घ्या व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
