९३.लेखाजोखा आणि ताळेबंद : Budget & balance sheet
येथे नोकरांना दररोज पगार दिला जातो असे बोर्ड तुम्ही पाहिले असतीलच; परंतु येथे मॅनेजरला दररोज पगार दिला जातो. असे बोर्ड कुठेच नसतात. कारण गरिबांना झटपट मोबदला हवा असतो, ते स्मार्ट वर्क न करता हार्ड वर्क करतात. संयमाने जास्तीचा वेळ आणि पैसा लावण्याची त्यांची मानसिकता सते. म्हणून ते गरीब असतात. या उलट ज्यांना श्रीमंत व्हावं वाटतं त्यांचे पॉन्ग टर्म व्हिजन आणि मिशन असते. ते स्मार्ट वर्क करून जास्तीचा वेळ देतात म्हणूनच ते श्रीमंत असतात.
तुम्ही आज काय आहात हे महत्त्वाचं नसून, तुम्ही पुढच्या काही वर्षांत काय बनणार आहात? काय मिळवणार आहात? हेच अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्यालाच बजेट प्लॅनिंग म्हणतात. तुमच्या पुढील वर्षाच्या लेखाजोख्याला एका वर्षाचे बजेट म्हणतात. एखाद्या व्यक्तीला आपण म्हणालो की या वर्षी म्ही हे विकत घ्या किंवा ते विकत घ्या. तर तो म्हणतो की माझे बजेट नाही राव. खरे तर बजेट म्हणजे काय? हेच त्याला समजलेले नसते. आपले जेवढे उत्पन्न तेवढाच खर्च करणे. त्यालाच अनेक लोक बजेट म्हणतात. परंतु तसे नसून बजेट म्हणजे पुढील वर्षीच्या उत्पन्न आणि खर्चाला म्हणजेच प्रोजेक्टेड बॅलन्सशीटला बजेट म्हणतात. प्रत्येक वर्षी ३१ मार्च पूर्वी ग्रामपंचायत,
महानगरपालिका, राज्य किंवा देशाचे अर्थमंत्री पुढील वर्षाचे बजेट मांडन असतात. तेव्हा ते पुढील वर्षभरात कोणत्या नवीन योजना आणायच्या, कोण कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा. हे अगोदर ठरवतात. त्यानंतर आपले उत्पन्न पाहतात. परंतु अगोदर खर्च लिहिल्यामुळे तो उत्पन्नापेक्षा निश्चितच जास्त असतो. त्यानंतर त्यासाठी ते जास्तीचे उत्पन्न मिळविण्यासाठी विविध मार्ग शोधतात. तसेच वायफळ खर्च कमी करतात. आणि उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग शोधतात. अशा बजेट थिअरीमुळेच विकास होत असतो. आधी जमा पाहून नंतर खर्च करायचे ठरविले तर विकासच होणार नाही. म्हणून प्रत्येकाने या बजेट थिअरीचा अभ्यास करून त्याप्रमाणे कृती केल्यास आपला वैयक्तिक आणि कार्पोरेट विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या १, ३ किंवा ५ वर्षाचे प्रोजेक्टेड बॅलन्सशीट लिहून काढा. त्यासाठी नवीन नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधा आणि ते पूर्ण करून आपली मोठ मोठी स्वप्नं पूर्ण करा. आता जीवनाच्या बॅलन्सशीटबद्दल…
आपला जन्म हा आपला ओपनिंग स्टॉक असतो. तर आपला मृत्यू हा क्लोजिंग स्टॉक असतो. जन्मभरात तुम्ही जे लोक मिळविता ते तुमचे क्रेडिट असते तर, तुम्ही जे लोक गमावता ते तुमचे डेबिट असते. तुमचे मित्र हे तुमचे असेट्स असतात, तर तुमच्या बॅड हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी या तुमच्या लायबिलिटीज असतात. तुमची चांगली प्रकृती हे तुमचं गुडविल असते. तर तुमचा आत्मा हा तुमचा फिक्स असेट असतो. तुम्ही जीवनात मिळविलेला आनंद हा तुमचा प्रॉफिट असतो. तर तुम्हाला झालेले दुःख हा तुमचा लॉस असतो. तुमचे चरित्र म्हणजे कॅरेक्टर हे तुमचे कॅपिटल असते. तर तुम्ही मिळविलेले ज्ञान ही तुमची इन्व्हेस्टमेंट असते. तुमचे वय हे तुमचा घसारा
म्हणजे डिप्रेशियेशन असते. आणि जन्मभर केलेले कर्म हा तुमच्या जीवनाचा ऑडिटर असतो. तुमच्या जीवनाची सर्वोत्तम बॅलन्स शीट बनवून, सर्वोत्कृष्ट जीवन जगा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
