९२.स्टार्टअप व्यवसायासाठीMSME वरदानच

९२.स्टार्टअप व्यवसायासाठीMSME वरदानच

तुम्हाला नवीन स्टार्टअप, व्यवसाय सुरू करायचा असेल, किंवा आहे तो व्यवसाय मोठा करायचा असेल. तर तुमच्यासाठी भारत सरकारची MSME ही योजना एक वरदानच आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्याबरोबरच युवकांमधील कौशल्याला बळ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

MSME म्हणजे मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, मायक्रो मध्ये १ कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक किंवा ५ कोटी रुपये पर्यंतचा टर्नओव्हर लागतो. स्मॉल साठी १ ते १० कोर्टीची गुंतवणूक किंवा ५ ते ५० कोर्टीपर्यंतचा टर्न ओव्हर लागतो व मीडियम साठी १० ते २० कोर्टीची गुंतवणूक किंवा ५० ते १०० कोर्टीचा टर्नरओव्हर असावा लागतो.

या योजनेचे फायदे १) कर्जासाठी गॅरेंटरची गरज नाही. तसेच गहाणखताचीही गरज नसते. २) कर्जावरील व्याजदर कमी ३) सरकारकडून सबसिडी ४) शासकीय टेंडर मध्ये प्राधान्य, ५) लायसन्स मध्ये सवलती. त्यासाठी कमीत कमी कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, शॉप अॅक्ट लायसन्स व आपल्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट हवा असतो. आपणही नवीन स्टार्टअप सुरू करा व यशस्वी उद्योजक बना. या संबंधी अधिक माहितीसाठी माझा उद्योजक होताना हा यू ट्यूबवरील व्हिडिओ पहा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!