९७.रिक्त मरण : Die Empty
तुम्हाला जर कोणी विचारलं की जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोणती ? तर तुम्ही म्हणाल मुंबईची, त्यापेक्षा श्रीमंत जमीन न्यूयॉर्क शहरातील, कोणी म्हणेल आखाती देशातील तेल विहिरींची जमीन, तर कोणी म्हणेल दक्षिण आफ्रिकेतील हिऱ्यांच्या खाणीची जमीन. परंतु Dai Empty या पुस्तकाचे लेखक टॉड हेनरी यांच्या मते जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी. त्याचे कारण ते सांगतात जगात दररोज अशी लाखो लोक मरण पावतात, ज्यांच्याजवळ विचारांचा अत्यंत मौल्यवान खजाना होता. त्यांच्याकडे टॅलेंट होते, बिझनेस आयडिया होत्या, अनुभवाची शिदोरी होती. परंतु त्या कोणालाही न देता त्या तशाच दफन झाल्या, जळून गेल्या. त्या कधीच जगासमोर आल्या नाहीत व त्यांचा इतरांना काहीच उपयोग झाला नाही. त्या ७ बाय ३ च्या जागेत दफन झाल्या, किंवा जाळल्या गेल्या.
जग जिंकलेल्या सिकदर ने मरण्यापूर्वी सांगितले होते की मी मेल्यावर माझे दोन्ही हात शेवपेटीच्या बाहेर मोकळे दिसतील असे ठेवा. त्याद्वारे जगाला कळू द्या मी जग जरी जिंकले असले तरी मरताना मोकळ्या हातानेच जावे लागते. म्हणून तुमच्याकडे असलेले ज्ञान, अनुभव, तुमच्या मधला चांगुलपणा, लेखक, कवी जगाला देऊन जा. कारण असे म्हणतात मरावे परी कीर्तिरूपी उरावे.
एक सज्जन धार्मिक माणूस मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येतो. बाहेर भिकारी असतो. त्याला काही तरी दान द्यावे असे वाटून तो त्याच्या खिशात हात घालतो व लगेच त्याच्या लक्षात येते की पैशाचे पाकीट घरीच राहिले. आणि तो भिकाऱ्याला म्हणतो, सॉरी मी उद्या तुला नक्की भीक देईन. असे म्हणून तो त्या भिकाऱ्याच्या जवळ जातो, त्याचे दोन्ही हात धरून हाताची पप्पी घेतो. त्याच वेळी भिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू येतात व याच्या हातावर पडतात. तेव्हा हा माणूस म्हणतो मी भीक दिली नाही म्हणून तू रडतोस का? त्यावर तो भिकारी म्हणतो नाही सर, अनेक लोक भीक देतात पण तुम्ही जे आज मला दिले ते प्रेम कोणी देत नाही. म्हणून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. पैसेच दिले पाहिजेत असे काही नाही तुम्ही रक्तदान, ज्ञानदान, आणि प्रेम द्यायला तर पैसेच लागत नाहीत. ते तुम्ही नक्कीच देऊ शकता. आपणही आपल्या परीने जे देता येईल ते द्या व रिक्त मरण अनुभवा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
