९१.असेट्स व तायव्यालिटीतील फरक समजून घ्या

९१ .असेट्स व तायव्यालिटीतील फरक समजून घ्या

असेट्स म्हणजे जमा किंवा येणे व लायबिलिटीज म्हणजे देणे किंवा अख खर्च, गरीब लोक उत्पन्न मिळवितात व तो खर्च करतात, शिल्लक शून्य असते. मध्यमवर्गीय लोक उत्पन्नातून खर्च करून EMI वर गरजेपेक्षा मोठे घर, मोठी कार, महाग मोबाईल अशा लायबिलिटीवर खर्च करतात; तर श्रीमंत लोक उत्पन्नातून उत्पन्न देणारे असेट्स जसे शेअर्स, बॉड, रेंट मिळणारी प्रॉपर्टी घेऊन त्या उत्पन्नातून खर्च करतात म्हणून ते अतिश्रीमंत होतात. आलेल्या उत्पन्नातून मोडून खात राहणे यामुळे गरिबीशिवाय अन्य काही पदरात पडणार नाही. तेच पैशाला पैसा जोडून अर्थात गुंतवणूक करीत गेल्यास त्याद्वारे मिळकतीत वाढ नक्की होणार आणि त्याद्वारे श्रीमंतीही वाढणार, तुम्हाला श्रीमंत व्हावे वाटत असेल तर आजपासून श्रीमंत होण्याचे स्वप्न पहायला घाबरु नका. श्रीमंत होण्यासाठी रिस्क घेऊन ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावा.
एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका. नवीन चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी बुध्दीमत्तेसाठी खर्च करा. तीच भविष्यातील गुंतवणूक आहे. हाती घेतलेले काम पूर्ण करा, वेळकाढू पणा करु नका. बचतीची सवय लावा, तुम्ही गरीब असा वा श्रीमंत, असेट्स आणि खर्च यातील फरक समजून घेऊन उत्पन्नातून २० ते ३० टक्के असेट्समध्ये गुंतवणूक करा व जीवनात यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!