जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

5.Self confidence: आत्मविश्वास

तुम्हाला एक चांगला नेता व्हायचय मग आत्मविश्वास बाळगायला शिका. फाजील नव्हे रास्त. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तरच तुम्ही पुढाकार घेऊन धैर्याने प्रश्नाला सामोरे जाऊन निर्णय घेऊ शकता. प्रखर आत्मविश्वास नसणारा माणूस निर्णय घेण्यास अक्षम ठरतो आणि निर्णय, खंबीर निर्णय न घेणारा माणूस कार्यकर्त्यांवर प्रभाव पाडू शकत नाही. प्रभाव टिकवू शकत नाही. म्हणून तुम्हाला अनुयायांवर प्रभाव पाडण्याची ईच्छा असेल तर सर्वात पहिलं तुम्ही आत्मविश्वास कमवा, बाळगा आणि मोठ्या हिंमतीने अडचणी, प्रसंगाना सामोरे जाऊन त्यातून वाट काढून आपल्या यशाचा मार्ग सुकर करा. हिच गोष्ट तुकाराम महाराज सांगतात ना. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानीयेले नाही बहुमता. लोक काय म्हणतात हे न बघता आपली ग्वाही म्हणजे मनाचा आत्मविश्वास हिच मेजोरीटी म्हणजे बहुमत समजा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

error: Content is protected !!