7. संगत चुकली तर !
आपण जन्मतः गरुड म्हणूनच जन्माला आलो आहोत. पण कोंबड्यासारख्या विचाराच्या संगतीत राहिल्याने, त्यांचा प्रभाव पडून आपणही आपली क्षमताच विसरून जातो व कोंबडी सारखे जीवन जगतो.
आपण अशा लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे. जे स्मार्ट असतील, क्रिएटिव्ह असतील, त्यांचे स्वप्न, त्यांचे स्किल व त्यांचे अनुभव खूप मोठे असतील. तुम्हाला जसे बनावे वाटते तशाच लोकांच्या संगतीत तुम्ही राहा. तुम्हाला जर कोणी सांगत असेल की तुम्ही आहेत त्यापेक्षा अधिक स्मार्ट बनूच शकत नाहीत. किंवा तुमच्या ग्रुपमधील तुम्हीच सर्वात स्मार्ट असाल तर आता वेळ आली आहे संगत बदलण्याची. कदाचित अशा नव्या स्मार्ट लोकांत तुम्ही सर्वांत कच्चे असाल, तरी चालेल. कारण तिथेच तुमचा ग्रोथ होईल. तिथेच तुम्ही आणखी स्मार्ट व स्किलफुल बनाल. कदाचित तुम्ही म्हणाल आमच्या आसपास असे स्मार्ट, क्रिएटिव्ह लोकच नाहीत. तेव्हा तुम्ही अशा यशस्वी लोकांच्या यशोगाथा वाचा. तुमच्या क्षेत्रातील अत्यंत यशस्वी लोकांची पुस्तके वाचा, त्यांचे व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच यशस्वी लोक दिसतील, तुम्ही त्यांना आणि त्यांच्या विचारांना फॉलो करा. तुम्ही निश्चित आणखी मोठे पाि यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्व अनुभव आहे. आपले A- जीवन हे पाण्यासारखे असते. पाणी जर दुधात मिसळले तर त्याचे दूध होते. दारूत मिसळले तर दारू बनते तर गटारात मिसळले तर त्या शुद्ध पाण्याचे बु गटारीतील घाण पाणी बनते. तुम्ही एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला दगड बांधून हौदात सोडले तर ते होदाच्या तळाशी जाईल. पण त्याच लोखंडाच्या तुकड्याला एका लाकडी फळीला बांधले तर ते खवळलेल्या समुद्रात सुद्धा तरंगत राहील. आणि त्याच लोखंडाच्या तुकड्याला परिसाने स्पर्श केला तर लोखंडाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच विचार करा कोण दगड आहे, कोण लाकूड आहे व कोण परिस आहे. कोणामुळे तुमचे भले होणार आहे. यावरून हे सिद्ध होते की माणूस जन्माने नव्हे तर संस्काराने, संगतीने व कमनि मोठा होतो.
तुम्ही गरुड म्हणून जन्माला आलेले आहात म्हणून गरुडासारखे संस्कार, ट्रेनिंग, संगत व कर्म करा व जीवनात गरुडभरारी घेऊन यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
