निसर्गाने दिलेल्या साधन संपत्तीचे व्यवस्थीत उपयोगात आणण्याची कला.
निसर्गाने आपणाला दिलेली संपत्ती आणि त्याचा आपण उपयोग करून आपले जीवन प्रगतीशील करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन.
निसर्गाने जमीन दिली हा झाला सोर्स (source). परंतु जेव्हा आपण ती पडीक किंवा वापरात नसलेली जमीन उपजावू किंवा शेती करण्यालायक करतो तेव्हा तो झाला Resource रिसोर्स.
सर्वसाधारण माणसेच असतात त्यांना आपण मनुष्य बळ सोर्स म्हणू, परंतु जेव्हा
आपण या अशिक्षित अडाणी किंवा अज्ञानी लोकांना शिक्षण ट्रेनिंग देऊन काही काम
करण्यालायक बनवतो तेव्हा तो होतो Resource.
निसर्गाने सोने कच्च्या रुपात दिले ते सोर्स आपण त्याचे फाईन गोल्ड किंवा दागदागिने बनविले तर तो झाला एक Resource.
निसर्गाने आपणाला पावसाचे पाणी दिले हा झाला सोर्स. आपण ते पाणी आपल्या बुद्धीमत्तेने अडविले आणि धरण, तलाव, कालवे बांधले तर तो झाला Resource. निसर्गाने आपणाला वारा दिला तोच झाला सोर्स. हाच वारा जेव्हा आपण ऊर्जा
निर्मीतीसाठी वापरुन पवनचक्की चालवतो तेव्हा तो होतो Resource.
थोडक्यात काय तर Resource म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण बुद्धीच्या जोरावर पुन्हा पुन्हा उपयोग करून घेणे आणि मानवी जीवनाची प्रगती करणे अर्थात निसर्गाची हानी न होईल किंवा कमीतकमी होईल हे पाहणे. आपली जबाबदारी पाळून हे सर्व केले तर उत्तम. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट करणे म्हणजे साधन संपत्तीचे
नियोजन करणे होय.
शिवाजी महाराजांच्या व्याख्येत सांगायचे झाले तर मॅनेजमेंट म्हणजे आर्ट ऑफ गेटींग थिंग्स डन श्रु पिपल्स बाय paying them proper remuneration.
म्हणजेच काय तर माणसांकडून काम करून घेण्याची योग्य कला आणि ती ही त्या माणसाला योग्य तो मोबदला देऊन काम करुन घेण्याची बांधीलकी. एखाद्याचे शोषण करुन काम करुन घेणे म्हणजे मॅनेजमेंट नव्हे असेच महाराजांना म्हणायचे असेल. महाराजांच्या मते ही काम करुन घेण्याची कला फक्त माणसापर्यंतच मर्यादीत नाही तर आपण ही कला निसर्गाकडून काम करुन घेण्यासाठी सुद्धा वापरु शकतो. उदा. नदीचे पाणी अडविण्याची कला. वाऱ्यापासून ऊर्जा निर्मितीची कला. समुद्राच्या लाटांपासून ऊर्जा मिळविण्याची कला. आग, धूर, आवाज यांचा संदेशवहन करण्यासाठी उपयोग करण्याची कला.
अर्थात ही कला कशी निर्माण करायची आणि उपयोगात आणायची हा ज्यांच्या त्यांच्या बुद्धीमत्तेचा भाग आहे. मॅनेजमेंटच्या जगातील विद्वानांनी केलेल्या काही व्याख्या पहा.
१. Management is the art of getting things alone through people -mary parker follet.
मॅनेजमेंट म्हणजे लोकांकडून काम करुन घेण्याची कला.
Management is the Art of getting things done through and with people in formally Organised groups – Herold Koontz
मॅनेजमेंट म्हणजे औपचारिकरित्या बनविलेल्या गटांकडून किंवा समूहाकडून काम करुन घेण्याची कला.
३. “Management is the accomplishment of Resources through the efforts of other people” Lawrence Appley. मॅनेजमेंट म्हणजे एखादे काम दुसऱ्याच्या मेहनतीतून साध्य करुन घेणे.
४. हेन्री फायोल याने मॅनेजमेंटची केलेली व्याख्या, “To manage is to forecast and to plan, to organise, to command, to co-ordinate and Control.” मॅनेजमेंट म्हणजे भविष्याचा अंदाज घेणे आणि त्यानुसार नियोजन करणे, त्यानुसार साधनसामग्री जुळवणे. त्यावर वर्चस्व ठेवणे, त्या साधनसामग्रीचा ताळमेळ घालणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे.
4. जॉर्ज टेरी याने मॅनेजमेंटची केलेली व्याख्या.
Management is a distinct process consisting of planning organising activities and controlling performance, to determine and accomplish stated objectives with the use of human being and other resources.
मॅनेजमेंट ही एक वेगळी प्रक्रिया आहे ज्यात नियोजन सामग्रीची जुळवाजुळव करणे. त्या सामग्री कामाला लावणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून ठरवलेले निश्चित असे ध्येय आणि कामे करुन घेणे अर्थात यासाठी मनुष्य बळ आणि इतर साधन सामग्रीचा उपयोग करुन घेणे होय.
६. पिटर ड्रकरने मॅनेजमेंटची केलेली व्याख्या
Management is the multi-purpose organ that manages a business, managers and manages workers and work.”
मॅनेजमेंट हे एक बहुउद्देशीय काम आहे, ज्यात व्यवसाय व्यवस्थापक, कर्मचारी आणि काम यांचे नियोजन करणे याचा समावेश होतो.
७. जेम्स लुंडी आणि लुईस अॅलेन यांनी मॅनेजमेंटची केलेली व्याख्या अत्यंत साधी सोपी आणि थोडक्यात आहे ती अशी,
Management is what management does.
Management is to manage men tactfully
आता मॅनेजमेंटच्या या सर्व व्याख्या शिवाजी महाराजांनी
त्यांच्या आयुष्यात प्रॅक्टीकली कशा वापरल्यात किंवा सिद्ध करुन ठेवल्या होत्या ते पहा-
व्याख्या नं १. Management is the art of getting things done
through people. महाराजांनी सर्व सामान्य मावळ्यांकडून असामान्य कामे करुन त्यांना यशस्वी करुन दाखविले. उदा. जीवा महाले, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे
कुन्ट याने केलेली व्याख्या नं २. महाराजांनी लष्कर बनविले, अष्टप्रधान मंडळ बनविले आणि त्या औपचारिक पद्धतीने बनविलेल्या समूहाकडून उत्तमात उत्तम कामे उत्तम पद्धतीने पार पाडून घेतली.
लॉरेन्स अॅथली याने केलेली व्याख्या म्हणजे लोकांच्या मदतीने निश्चित ध्येय प्राप्त करणे. महाराजांनी सर्व सामान्य लोकांच्या साक्षीने स्वराज्याची स्थापना केली आणि राज्याभिषेक करुन एक स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण केले. तेही रयत कल्याणकारी म्हणजे welfare of the people in the state होय.
हेन्री फेयॉल याने केलेली व्याख्या नं ४. महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा अंदाज घेतला. त्यानुसार नियोजन केले. त्यानुसार साधनसामुग्रीची जुळवाजुळव केली आणि त्या साधन सामग्रीचे व्यवस्थापन करुन त्यांचा ताळमेळ ठेवून
त्या साधन सामग्रीवर नियंत्रण ठेवले.
जॉर्ज टेरी याने केलेली व्याख्या नं ५. मॅनेजमेंट ही एक वेगळी प्रक्रिया आहे ज्यात महाराजांनी स्वराज्य स्थापना करताना नियोजन, जुळवाजुळव, अंमलबजावणी नियंत्रण इत्यादी करुन एक ठरविलेले ध्येय मनुष्यबळ आणि इतर साधनसामग्रीचा उपयोग करुन पूर्ण केलेली आहे.
पिटर ड्रकरने केलेली व्याख्या नं ६. महाराजांनी स्वराज्य निर्मिती करताना काय केले तर हेच स्वराज्य हे बहुउद्देशीय काम ज्यात व्यवस्थापक, व्यवसाय आणि कामगार यांचे नियोजन केले.
व्याख्या नं ७ जी Jemes Landy आणि Louis Allen याने केली ती महाराजांनी कशी अंमलात आणली पहा व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापने जे करु शकत ते सर्वकाही. महाराजांनी आयुष्यात सर्व काही करुन ते सार्थ केले.
अर्थात मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या एवढ्या सगळ्या व्याख्या मी तुम्हाला का सांगितल्या तर हे सर्व जण जगातील टॉपचे मॅनेजमेंटचे गुरु असून यांनी जे विचार मांडले ते त्यांच्या आजोबा पंजोबाच्याही जन्माच्या अगोदर दोनशे वर्षापूर्वी महाराजांनी अंमलात आणून मॅनेजमेंटची परीपूर्ण व्याख्या तयार केली होती.
कदाचित महाराजांचे जीवन आणि इतर महापुरुषांचे जीवन पाहूनच या सर्वांनी व्यवस्थापनाच्या व्याख्या केलेल्या असाव्यात. महाराज सोळाव्या शतकात तर या व्याख्या आहेत एकोणीसाव्या शतकातील. त्यामुळे यांच्या व्याख्या किंवा तत्वज्ञान महाराजांनी वापरले असे म्हणण्यापेक्षा या पठ्यांनी महाराजांचे तत्वज्ञान आपली बुद्धीमत्ता वापरुन जगासमोर मांडले असे म्हणणेच जास्त तर्कसंगत वाटते. म्हणून महाराज मॅनेजमेंटचे गुरु ठरतात आणि ती मॅनेजमेंट फक्त एका उद्योग समूहाच्या प्रगतीसाठीची नाही तर सर्वसामान्य माणसाच्या भरभराटीसाठी निर्माण केलेली यशस्वी व्यवस्थापन निती होय.
welfare of common man and national welfare management for all हे महाराजांचे धोरण किती विश्वव्यापी आहे ते आपण समजून घ्या.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
वेबसाईट लिंक :-https://nagebabaudyojakmanch.org

