व्यवस्थापनाची चौदा रत्ने – २. Authority and Responsibility: अधिकार आणि जबाबदारी

२. Authority and Responsibility: अधिकार आणि जबाबदारी

हेन्री च्या मते आपण जेव्हा एखाद्याला अधिकार देतो तेव्हाच त्याला त्या कामाची जबाबदारी म्हणजे उत्तरदायित्वसुद्धा दिले पाहिजे. म्हणजेच काय तर काम करण्याची संधी देतानाच त्याच्या परिणामाची जबाबदारी सुद्धा घ्यायला लावली तरच तो माणूस जबाबदारीने काम करेल. आपण जास्त अधिकार दिले आणि कमी जबाबदारी मग अधिकाराचा दुरुपयोग होतो आणि उलट जास्त जबाबदारी आणि कमी अधिकार दिला तर तो माणूस दबावाखाली काम करु शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. माणूस नैराश्याकडे कलला जावून त्याचा विपरीत परिणाम कामावर होऊ शकतो. म्हणून कधीही यशस्वी व्यवस्थापकाने अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल साधला पाहिजे जेणेकरुन सहकारी उत्साहाने काम करतील किंवा हिरीरीने भाग घेतील.

उदा. शिवाजी महाराजांनी सेनापतीला युद्धाचे अधिकार दिले त्याच प्रमाणात सेनापतीला युद्धाचे यश अपयशासाठी जबाबदार धरले जाणार अशी व्यवस्थाही केली होती आणि या अधिकार आणि जबाबदारीचा समतोल साधला असल्यामुळेच संपूर्ण हयातीत स्वराज्याचे एकाही सेनापतीने कधी अधिकाराचा दुरुपयोग केलेला दिसत नाही. तर दुसऱ्या बाजूला कर्तव्याच्या भावनेला जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून कधी राजीनामा दिला नाही किंवा बंडखोरी केली नाही. किंवा ते महाराजांना सोडून जाण्याचा कधीही विचार करु शकले नाहीत. हे सेनापतीचे नव्हे तर सर्वसामान्य सैनिकाच्या बाबतीतही धोरण महाराजांनी राबविले आहे.

एकदाच प्रतापराव गुजरांनी माणुसकीच्या भावनेला दयेच्या अर्जाला बळी पडून हाती आलेल्या बहलोल खानाला जीवदान दिले. म्हणजेच काय तर आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला तर महाराजांनी लगेच प्रतापरावांना यासाठी जबाबदार धरले आणि प्रश्न विचारला, सला काय निमित्ते केला. हा एक प्रकारचे show cause notice कारणे दाखवा नोटीस असून पुढे त्यात Memo देखील आहे. आता जर पुन्हा भविष्यात बहलोन स्वराज्यावर चालून आला तर तुम्हालाच जबाबदार धरले जाईल. स्वराज्याचे जे क. ही नुकसान होईल त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील असे सुनावले की नाही !

दुसऱ्या एका प्रसंगात अफजलखान वधानंतर नेताजी पालकरांना घाट माथ्यावरील फळी फोडून संध्याकाळी वाईला यायला सांगितले असताना नेताजीला उशीर झाला तर महाराजांनी त्यांना फाजलखान आदीचा पाठलाग करुन पकडण्यास सांगूनअधिकार आणि जबाबदारीचा समन्वय साधला ना! इथे महाराज रागावले ही नाहीत किंवा कारणे दाखवा नोटीस बजावली नाही. कारण खानाची फळी फोडून येताना झालेला विरोध कडवा झाला असेल हे गृहीत धरुनच महाराजांनी सामंजस्याने घेतले असाच याचा अर्थ होतो. यालाच म्हणतात प्रसंगावधान राखून माणसाने Authority आणि Responsibility यांचा समन्वय साधणे.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whats app ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!