९. Scalar chain:
Scalar chain म्हणजे काय तर line of command which runs from the top level to the lowest level in the organization.
संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये एखादा दिला गेलेला आदेश वरुन खाली ज्या टप्प्याटप्याने येतो त्याला म्हणतात Scalar chain बाकी काय. म्हणजे काय तर मालक थेट जर कामगाराला आदेश देणार असेल तर मग मॅनेजिंग डायरेक्टर, शाखा मॅनेजर, सुपरवायझर, नेमायची झंजट कशाला ?
तर कोणताही आदेश व्यवस्थितपणे खालीपर्यंत पोहचला पाहिजे. अर्थात वेळ न दडवता अर्थ न बदलता नाहीतर ध चा म होऊ शकतो किंवा उशीर आदेश मिळाल्याने अर्धमेला व्हायची वेळ यायची. काही विशिष्ट परिस्थितीत मात्र ही chain break करता येऊ शकते किंवा प्रसंग काळ प्रश्नाचे गांभिर्य ओळखून थेट ज्याच्याकडून अंमलबजावणी अपेक्षित आहे. अशा माणसाला थेट वरुन थेट खाली आदेश दिला जाणे केव्हाही चांगले.
महाराजांचे मुलकी आदेश प्रशासकीय निर्णय हे मंत्री सुभेदार महालदार असे करतच खाली गावात यायचे तर लष्करी बाबतीत एकतर तो आदेश सेनापतीला आणि तेथून खाली संबंधीत अधिकारी यांच्या मार्फत पोहचविला जाई. काही विशिष्ट प्रसंगात महाराज ही चैन तोडून थेट गावात पाटलाच्या नावे आदेश पाठवित. उदा. गावच्या आठवडा बाजाराच संरक्षण करुन तो बाजार व्यवस्थित भरवणं आणि महसूल गोळा करण यात काही अडचण आली तर थेट महाराजांचा आदेश तिथला नाईकवाडी किंवा पाटलाकडे विनाविलंब येऊन धडकत असे ग्रामीण भागात लोकांना जीवनाश्यक वस्तू मिळण्याचा एकच दिवस असतो आणि तो म्हणजे आठवडा बाजार. लोकांच्या गरजेची ही तीव्रता आणि हाताशी असलेला कमी वेळ याचा ताळमेळ साधत महाराज थेट गावात आदेश नाही तर तंबी देत किंवा कामचुकारपणा होत असेल तर तशी show cause ची नोटीस देऊन बडतर्फीचा आदेश दिला जात असे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

