जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये :८. Leadership Skill: नेतृत्व करण्याचं कौशल्य

जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये :८. Leadership Skill: नेतृत्व करण्याचं कौशल्य

 

८. Leadership Skill: नेतृत्व करण्याचं कौशल्य

एक चांगल्या व्यवस्थापकाला एक चांगला नेता कावच लागतं, नेतृत्व कर म्हणणे एखादया कामासाठी पुढाकार घेऊन इतरांना ते काम करण्याची प्रेरणा देऊन त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांच्याकडून ते काम योग्य पद्धतीने योग्य वेळेस करुन घेल लोकांना प्रेरणा न देणारा नेता होऊच शकत नाही. प्रेरणा हाच नेत्याचा प्राण असतो. आफि ज्यांच्यात प्रेरणा नसते तो अगोदरच गतप्राण असतो. तो आयुष्यभर कार्यकर्ताच राहत भेंडे लावणे, बॅनर लावणे, सतरंज्या उचलणे याच्या पुढचं काम त्याला मिळूच शकत नाही आणि म्हणून एक तत्ववेत्ता अचूकपणे सांगतो you cant be leader as long as you are follower.

जोपर्यंत तुम्ही अनुयायी असता तोपर्यंत तुम्ही पुढारी होऊ शकत नाही. म्हणजेच पर्यायानं काय निष्पत्र होते तर प्रेरणा देणारा नेता आणि प्रेरणा घेणारा कार्यकर्ता. आणि जेव्हा तुम्ही स्वतः नवीन विचार मांडता, संकल्पना मांडता लोकांना त्या पटवून देता (गळी उतरवणे नव्हे) तेव्हा लोक प्रेरणा घेऊन तुमच्या मागे येऊ लागतात तेव्हाच तुम्ही नेता होता आणि नेता होण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या Leadership style वापरल्या जातात आणि त्या स्टाईल तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. शिवाय परिस्थितीप्रमाणे तुम्ही आपल्या नेतृत्व पद्धतीत बदल केले पाहिजेत. कारण सज्जन लोकांना सभ्य भाषेत प्रेरणा मिळते तर आडदांड लोकांना दांडक्याची भाषा कळते. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत सांगून त्याला प्रेरणा देण्याचं काम म्हणजे नेतृत्वाचं कसब भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी हे प्रसंगानुरुप नेतृत्व कौशल्य किंवा लोकांशी वागण्याची पद्धत तुकारामानी आपल्या भाषेत सांगितली आहे.

काळ वेळ आणि प्रसंग बदलतो तसे नेत्याने आपली नेतृत्वाची पद्धत बदलती ठेवली पाहिजे. तुमचा गैरसमज होतोय नेत्यानं बदलायचं नाही नेता आपल्या विचारावर ठाम असला पाहिजे. लोकांशी संवाद करण्याची वागण्याची पद्धत त्याने लोक पाहून वेळ, काळ पाहून ठरवावी असा अर्थ आहे. सरड्यासारखे रंग बदलणे नव्हे रंग बदलू नेता यशस्वी होत नसतो. त्याने परिस्थिती बदलायची असते जागा नव्हे. लोकांना जागेवर आणणं म्हणजे नेतृत्व.

खरा नेता तोच की जो स्वतः ध्येय ठरवतो, गाठतो आणि इतरांनाही ध्येयापर्यंत घेऊन जातो. सगळ्यांनी एकत्रच प्रवासाला सुरुवात करुन भागत नसतं तर सर्वांनी एकत्र ध्येयापर्यंत चालणं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. भगवान श्रीकृष्ण हंडी फोडायचे तर

वही काय एकटे खात नसायचे. सगळ्यांना वाटप करुन खायचे आता असला नेता पहायला मिळणं अवघड जो अगोदर सर्वगत्चाचं मावळ्याचं पोट भरती आणि मग स्वतःच काय ते पाहतो!

महाराजाचं नेतृत्व कौशल्य एकाच वाक्यात प्रामाणिकपणे सांगायचे म्हटलं तर एक संन्याशी ज्याने लाखो लोकांचा संसार केला. लाखो लोकांना अगोदर वाटलं. कायम वाटलं आणि एवढं सगळं करताना वर्षाचं उत्पन्न दोन लाख कोटी रुपये असताना स्वतःच्या चैनीसाठी एकही बंगला बांधला नाही की फार्महाऊससुद्धा नाही. महाराजांचं आयुष्यच एक फार्म होतं आणि महाराज त्यात माणसं माणुसकी पिकविणारी शेती करीत होते.

त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना जो आयुष्यभर वाटतो तोच खरा नेता आणि जो आपल्या सहकाऱ्यांनाच आयुष्यभर लुटतो त्यांची वाट लावतो तोच खरा लांडगा, जो कळपाच्या सोबतीला येऊन कळपाचीच शिकार करतो असा कपाळ करंटाच. लोकांना वाटेला लावणं आणि वाट लावणं यातलं सुक्ष्म अंतर समजलं की चांगला नेता आणि वाईट नेता यातला फरक करणं अगदी सोपं जातं. कुटुंब कल्याणासाठी उभा राहतो तो छोटा नेता. राष्ट्र कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी उभा राहतो तो मोठा नेता आणि स्वार्थासाठी समाजसेवेची सोंग ढोंग करणारा खोटा नेता. नेतृत्वाचे प्रकार किंवा वेगवेगळ्या शैली काय असतात ते थोडक्यात पाहू. पुढे नंतर विस्तारीत रुपात सांगूच की.

৭. Autocratic style हुकुमशहा पद्धत

२. Bureaucratic style प्रशासकीय पद्धत

३. Consultative style चर्चात्मक पद्धत

४. Participative style सहभागी

५. Laissez faire style मुक्त संवाद पद्धत

६. Paternalistic style कौटुंबिक पद्धत

७. Sociocratic style सामाजिक पद्धत

८. Neurocratic style ध्येयवादी पद्धत

९. Situational style प्रासंगिक पद्धत

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!