२ . लवकर उठा, यशस्वी व्हा..
सकाळी लवकर उठणे ही यशस्वी सवय आहे. Early to rise and early to bed is very good habit for health, wealth and success. लवकर उठे, लवकर निजे तया आरोग्य, यश अन् धन लाभे. जो जागत है वह पावत है। और जो सोवत है वह खोवत है।, असे म्हटले जाते. सूर्यासारखे चमकायचे तर सूर्योदयापूर्वी उठा. जगात यश मिळविणारे साधूसंत, विद्यार्थी, उद्योजक हे सारे लोक सकाळी लवकर उठतात. पहाटेचा ब्रम्हमुहूर्त सर्वात पॉवरफुल असतो. त्यावेळी तुम्ही जे कर्म कराल त्याचा फायदा काही पटीत मिळत असतो. त्यावेळी पुढील तीन मंत्र तुम्ही ११ वेळा म्हणा. १. हे परमेश्वरा माझ्या अगोदरच्या चुका माफ कर. २. मी फार भाग्यशाली आहे. ३. माझे संभाषण कौशल्य सर्वोत्तम आहे.
लवकर उठला तर तुम्हाला अडथळे येत नाहीत. जे कराल ते परफेक्ट असेल. सकाळी लवकर उठणारे लोक कॉन्फिडंट व एनरजेटिक असतात. दिवसभर पॉझिटिव्ह व फ्रेश राहतात. यातून रिझल्टही जास्त मिळतो. माणूस सोडून सगळेच प्राणी पहाटेच उठतात. त्यामुळे ते आजारीही कमी पडतात. लवकर उठला तर शारीरिक व मानसिक फिटनेससाठी व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यानधारणेसाठी तुम्ही वेळ देऊ शकता. तुम्ही फक्त एक तास लवकर उठण्याची सवय लावली तर एका वर्षात ३६५ तास अर्थात कामाचे किमान ४५ दिवस जास्त मिळतात. हा दुष्काळात १३ वा महिना नव्हे तर यशाचा १३ वा महिना ठरेल. म्हणून लवकर उठा व उठल्याबरोबर म्हणा, यशस्विता हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच !
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा: https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
