नियोजन करण्याचे टप्पे
तर आता आपण पाहूयाच की नियोजन नक्की केले तरी कसे जाते ते अर्थात नियोजनाचे टप्पे कोणते ते समजून घेऊया.
१. Analysis of internal environment : अंतर्गत परिस्थिती किंवा वातावरणाच विश्लेषण करणं
नियोजन करण्याच्या प्रक्रियेतील मुलभूत आणि पहीला टप्पा म्हणजे आपल्याला संस्थेतील कंपनीतील राज्यातील अंतर्गत वातावरण परिस्थिती यांचं चांगलं विश्लेषण करणं सध्या आपल्याकडं किंवा आपल्या हाती काय-काय साधनसामग्री आहे याची चाचपणी करणं, ही साधन सामग्री म्हणजे काय तर आपल्याकडं किती माणसे आहेत किती मशीन आहेत, किती मटेरियल आहे आणि आपल्या संस्थेची रचना Organisational structure कसे आहे याचं विश्लेषण करणं.
हे विश्लेषण करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपले ताकद Strength आणि कमजोरी weakness कळून येते. म्हणजेच काय तर आपरे अंथरुण किती आहे हे आपल्याला कळून येते आणि मग त्यानंतर आपण पाय करें पसरायचे किंवा किती पसरायचे याचा निर्णय घेऊ शकतो ना!
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W
