7. संगत चुकली तर !
हा सर्व परिणाम संगतीचा आणि संस्कारचा असतो. आपल्या बहुतेकांच्या जीवनात असेच घडते. तुम्ही ज्यांच्या संगतीत राहता, त्याचप्रमाणेच तुम्ही बनता. कारण संगत. आपल्या संगतीतील ५ लोकांचे आपण एव्हरेज असतो. संगतीतील लोकांचा प्रभाव आपल्यावर पडल्याशिवाय राहत नाही. इंग्रजीत एक जुनी म्हण आहे Show your friends, I will show your future. याचा अर्थ तुम्ही मला तुमचे मित्र दाखवा, मी तुम्हाला तुमचे भविष्य दाखवितो.
आपल्या संगतीतील लोकांचे विचार कसे आहेत हे जर तुम्हाला समजत नसतील तर तुम्ही स्वतःलाच तीन प्रश्न विचारा १) त्यांच्या संगतीत तुम्ही सर्वात जास्त चर्चा कोणत्या विषयावर करता. २) त्यांच्या संगतीत असताना तुम्ही कोणता विचार करता व ३) त्यांच्या संगतीत असताना तुम्ही काय करता.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
