विचार करा आणि श्रीमंत व्हा :Think and Grow Rich

विचार करा आणि श्रीमंत व्हा :Think and Grow Rich

 

माणसाचे विचार श्रीमंत असतात तोच पैशाने श्रीमंत बनतो. असा ज्यायस सिद्धांत सांगितला जातो. माणसाकडे फक्त पैसे असले म्हणजे तो श्रीमंत राहतो असे नसते. कौन बनेगा करोडपती मध्ये बिहारच्या गरीब कुटुंबातील सुशीलकुमारला पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. पण त्याला ते पैसे सांभाळता आले नाहीत. पाच वर्षांनंतर तो पुन्हा गरीब झाला आहे.

तुम्हाला यशस्वी आणि श्रीमंत व्हायचं रहस्य जाणून घ्यायचय का? ते रहस्य दडलय नेपोलियन हिल यांच्या ‘थिंक अॅण्ड ग्रो रीच’ या पुस्तकात. १९८४ साली मी नेपोलियन हिल या प्रसिद्ध लेखकाचे ‘थिंक अँड ग्रो रीच’ आणि ‘लॉ ऑफ सक्सेस’ ही दोन पुस्तके मी विकत घेऊन वाचली, अनुभवली आणि त्यामधून माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले. या पुस्तकात यश आणि पैशाबद्दल सांगितले आहे. खरे तर पैशाचा विषय निघाला की अनेक जण म्हणतात की पैसा वाईट आहे. पैसा माणसांना आंधळा बनवितो.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!