Leadership नेतृत्व म्हणजे काय ?
एकमेका सहाय्य करुन अवघे धरू सुपंथ. कार्यकर्त्यांना जागा नाही. तुकाराम महाराजांनी नेतृत्वाची केलेली व्याख्या पहा किती समर्पक आणि बोलकी आहे. एकमेकांना सहाय्य करुन सर्वाचा उद्धार करुया. हीच शहाण्या नेतृत्वाची १६ व्या शतकातील व्यापक व्याख्या शिवाजी महाराजांनी अंमलात आणली. नाहीतर आमचे नेते कार्यकर्त्यांनी एकमेकां सहाय्य करु आणि फक्त नेत्यांनी सुपंथ धरुया म्हणजे प्रगती करुया. अशी पोटापुरती व्याख्या केली आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांना सहाय्य करायचे असते आणि ते कोणत्या कामासाठी तेही ठरलेलं असतं. झेंडे लावणे बॅनर लावणे आणि सतरंज्या उचलणे टाकणे एवढं एकच काम कार्यकर्त्यांना बाकी राहिलेलं असतं.
लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही अनुयायी राहताल तोपर्यंत तुम्ही नेतृत्व करु शकत नाही. जोपर्यंत तुम्ही कार्यकर्ता म्हणून मिरवताल तोपर्यंत तुम्ही कधीही नेता होऊ शकत नाही. मग जगजेता व्हायची दिवास्वप्न कशाला पाहता ? म्हणून अगोदर नेतृत्व म्हणजे काय ते कसे केले जाते हे समजून घ्या आणि मगच नेतृत्व करायला समाजकारणात राजकारणात उतरा. पाण्यात उतरायचे तर ते गटांगळ्या खाण्यासाठी नव्हे तर पैलतीरी जाण्यासाठी आणि विसरु नका एकट्याने पैलतीरावर जाणं म्हणजे नेतृत्व नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाणं.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
