१८ यशाचा कानमंत्र
य.ए.एस. अधिकारी होणे हा काही अपघात नसतो. तसेच आहोणं हाही अपघात नसतो. चांगला दृष्टिकोन, चांगल्या सवयाचे चांगले कर्म जर परत परत आणि रोज रोज केले तर मनुष्य जीवनात यशस्वी होतो. ही काळा दगडावरची रेघ असते. तसेच चुकीचा आणि नकारात्मक दृष्टिकोन, चुकीच्या सवयी आणि चुकीची कामे, रोज रोज केल्यास अपयश येते. हीही काळ्या दगडावरची रेघ असते. हाच सृष्टीचा नियम असतो. सृष्टी हे पाहत नाही की तो गरीब आहे की श्रीमंत आहे. स्त्री आहे का पुरुष आहे. तो कोणत्या जातीचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिक्षण कशासाठी घेता? हे अगोदर ठरविणे गरजेचे असते. ९५% विद्यार्थी समजतात की शिक्षण हे परीक्षेत पास होऊन डिग्री मिळविणे आणि त्याआधारे नोकरी मिळविणे. हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम अभ्यासात, परीक्षेत यशस्वी व्हा. त्यासाठी स्वतःला ओळखा. Who am I? मी कोण आहे?
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
