१८ यशाचा कानमंत्र
तुमच्या जीवनाची त्रिसूत्री समजून घ्या आणि यशस्वी व्हा. त्यामध्ये पहिले स्वतःला ओळखा. स्व अध्यायाने स्वतःचा अभ्यास करा. बारावीनंतर आवडीचे क्षेत्र निवडा व निवडलेल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत बना. तुमच्या डोक्यातील मेंदू म्हणजे तुमच्या यशरूपी मोबाईल मधील सिम कार्ड आहे. त्यामध्ये काय सेव्ह करायचे आणि काय डिलीट करायचे, ते कोण ठरवणार? तुम्हीच ना? त्या मेंदूरूषी सिम कार्डमध्ये, तुमचे ध्येय, तुमचे करिअर, तुमच्या मायबापाचे आस लावून बसलेले डोळे फीड करा. नसता काही नालायक, बापाच्या पैशावर जो डेटा मिळतो ना! त्यामध्ये फालतू जोक्स, उघडे नागडे फोटो फीड करून जीवनाचे वाटोळे करू नका. प्रेमाचा सैराट क्षणिक असतो. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने असे सैराट बना, की तुमचा अभिमान वाटेल असे कार्य करा. तुमच्या यशाचा पतंग उंच उंच उडवा. मग बघा तुमच्या मागे १७ पोरी व त्यांचे बाप पळत येतील. ते येरझरा घालतील. परंतु शिकण्याच्या काळात तुम्ही काही वर्षे जर वाया घालविली तर कोणतीच पोरगी तुमच्यासाठी सैराट होणार नाही. आणि त्यानंतर मात्र तुम्हाला जन्मभर अलख निरंजन म्हणून जीवन जगावे लागेल. विद्यार्थी असताना तुम्ही थोडी अभ्यासाची सजा दिली तर जन्मभर मजा माराल. आणि आता मजा मारली तर जन्मभर सजा भोगाल, योग्य निवड करा आणि जीवनात यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://nagebabaudyojakmanch.org/१८-यशाचा-कानमंत्र-5/
