जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

२. Intelligenece बुद्धिमत्ता

बुद्धिमतेची ताकद किती असते सांगू का. हॅरी पॉटर नावाची पुस्तके लिहून जे. के. रोलिंग या महिलेने ब्रिटनच्या राणीपेक्षा जास्त संपत्ती कमावली. बिल गेट्स, वॉरेन बफे, रे क्रॉक या सर्व मंडळीच्या यशाचे कारण एकच बुद्धीमता. धीरुभाई अंबानी, अजीम प्रेमजी ही भारतीय नाव पहा. बुद्धीमतेपुढे जग झुकतं ते असं. म्हणून नेता होण्यासाठी पांढरे कपडे घालून, कोणाचीतरी स्टाईल चोरुन आयुष्यभर फक्त कार्यकर्ता म्हणून जगण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर जरा अक्कल कमवून लोकहो कधी तरी नेताही व्हा. अर्थात फक्त पैसा कमवू नका तर नावही कमवा. लोकांची कामही करा. पुढच्या निवडणुकीत पैसा वाटावा लागणार नाही एवढं लोकाचं प्रेम, आपुलकी कमवा. थोडक्यात सांगू का ? कायम श्रीमंत माणूस रहायचं असेल तर माणसं मिळवा, माणसं कमवा. हीच खरी श्रीमंती. श्रीमंत माणसं कमावून गरीब होण्यापेक्षा गरीब माणसं कमावून श्रीमंत व्हा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!