जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

२. Intelligenece बुद्धिमत्ता

नेत्याची बुद्धीमत्ता म्हणजे त्याची शैक्षणीक किंवा तांत्रीक गुणवत्ता असे म्हटले तरी चालेल. परंतु गरज नाही की आपल्याकडे श्रीमंत होण्यासाठी मोठी पदवीच असावी लागते. जगातील बरीच श्रीमंत माणसे पदवीधारक नाहीत. परंतु ते पदवीधारक लोकांना कामाला ठेवतात. बरीच मोठी माणसं MBA नाहीत पण ते आपले कामकाज सांभाळण्यासाठी MBA झालेली माणसे ठेवतात. कारण शिकलेली माणसं पैशासाठी काम करतात आणि श्रीमंत माणसं बुद्धीने काम करुन पैसा मिळवतात व त्या पैशातून पगारी माणसं कामाला ठेवून आणखी श्रीमंत होतात. यालाच जगाच्या भाषेत बुद्धीमत्ता म्हणतात. लक्षात ठेवा ज्याच्याकडे बुद्धीमता त्याच्याकडे पैसा आणि सत्ता. नसेल ज्ञान कमवायची लालसा तर नाही मिळणार बुद्धीमता अन् रहा आयुष्यभर कार्यकर्ता असं काय उलट कामकरता ! लोकांनी तुमच्या श्रीमंतीकडे यशाकडे पाहून म्हटले पाहिजे अरे तुम्ही नक्की काय काम करता असे लोकांनी तुम्हाला विचारावे असे जबरदस्त, भारदस्त काम करा.

बुद्धीमत्तेचा कमाल उपयोग करुन कमाल यश मिळवा हीच तुमची श्रीमंती ठरु शकते.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!