२२. शारीरिक ऊर्जा वाढवा

२२. शारीरिक ऊर्जा वाढवा

दोन गोष्टी तुम्ही कधीच पैशाने खरेदी करू शकत नाहीत. एक सुदृढ शरीर आणि दोन शांत मन आणि मनातील आनंद. तरुणपणीच मृत झालेल्या व्यक्तीच्या कानाजवळ जाऊन तुम्ही जर त्याला म्हणालात, की मी तुला दहा करोड रुपये देतो. दहा किलो सोने देतो. किंवा एखादी सुंदर स्त्री देतो. तर ती मृत व्यक्ती काहीच बोलणार नाही. कारण ती जिवंत नसते. जिवंत असताना वाईट सवयीने शरीराकडे दुर्लक्ष करून ज्या गोष्टीसाठी तो पळ पळ पळाला. मेल्यावर त्याचे त्याला काहीच देणे घेणे नसते.

तुम्हाला हेल्थ, वेल्थ आणि हॅपिनेस हवा असेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम करून श्रीमंत, यशस्वी होऊन समाधानी जीवन जगायचे असेल, तर तुम्हाला तुमची शारीरिक फिटनेस आणि शारीरिक ऊर्जा वाढवावीच लागेल. तुमच्या उतार वयात तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा चांगला उपभोग घ्यायचा असेल तर तुमचे शरीर स्ट्राँग असलेच पाहिजे. तुमच्या शरीराला थंडी, ऊन, वारा, पाऊस सहन करून १०/१२ तास स्फूर्तीने काम करण्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवून शारीरिक ऊर्जा वाढवावी लागेल.

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!