४. Innovative : नावीन्यता
नाविन्यता या शब्दात आलं सगळं काही. ज्याला नेता व्हायची खुमखुमी आहे त्याच्याकडे बुद्धीमता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती असली की नावीन्यता जन्माला येतेच की. ज्याला यशस्वी नेता व्हायचं असतं त्याच्या डोक्यात नेहमी नवीन नवीन विचार, संकल्पना, कल्पना युक्ती याचं वादळ फिरतं राहिलं पाहिजे. म्हणजे नेत्याचा मेंदू हा नव-नवीन कल्पनेला जन्म देणारा एक झंझावात असला पाहिजे. नव-नवीन कल्पना शोधुन त्या अंमलात आणून जगाला आश्चर्यचकीत करणारे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. तुम्ही असा कसा निर्णय घेतला याचा विचार करता करता भल्याभल्या विद्वानांचा मेंदू सुन्न झाला पाहिजे. त्यांच्या मेंदूला झिणझिण्या आल्या पाहिजेत. असेच निर्णय जर तुम्ही घेतले तर तुम्ही तुमच्या अनुयायामध्ये स्विकारले जाता आणि जगात प्रसिद्धी मिळवून जाता हे लक्षात ठेवा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
