२२. शारीरिक ऊर्जा वाढवा

२२. शारीरिक ऊर्जा वाढवा

निरोगी, सुदृढ शरीरासाठी आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी कोल्ड्रिक्स आणि पॅकेज फूड खाणे बंद करा. टीव्ही वर सर्वात जास्त जाहिराती या जंक फूड, पॅकेज फूड आणि पिझ्झा बर्गरच्या असतात. या जाहिरातीमधील पदार्थांनी लहान मुलांच्या शरीराचे वाटोळे केले आहे. पिझ्झा बर्गर व जंक फूड मधून कोणतीही शारीरिक ऊर्जा मिळत नाही. उलट शरीराचे वाटोळे होते म्हणून तुम्ही त्यापासून दूर राहिलात तर तुमची पुढची पिढीही दूर राहील. मैदा रोट्या कमी खाऊन काकडी, मुळा, टमाटे सारखे सलाड तसेच न भाजलेले आणि मोड आलेले कडधान्य जास्त खाऊन तुम्ही तुमची शारीरिक ऊर्जा वाढवा. व्यसनामुळे आपल्या शरीराचे आणि कुटुंबाचे वाटोळे होते. आजची तरुण पिढी स्टेटस सिम्बॉल म्हणून व्यसनाकडे झुकताना दिसत आहे. म्हणून त्यापासून दूर राहा.

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!