२३ .स्वतःवर विश्वास ठेवा
यशस्वितेचा कायदा अर्थात Law of success या प्रसिद्ध पुस्तकाच्या प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला एक गोल्डन स्टेटमेंट आहे. ते म्हणजे You can do it, if you believe that you can, म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकताच. सावित्रीला विश्वास होता म्हणून साक्षात यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणलेच ना! २०१० सालापर्यंत वन डे क्रिकेटमध्ये २९६३ सामने होईपर्यत कोणालाही डबल हंड्रेड अर्थात २००, धावा करता आल्या नव्हत्या. पण सचिन तेंडुलकरने स्वतःवर विश्वास दाखवीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डबल हंड्रेड केले. त्यानंतर अनेकांनी डबल हंड्रेड केले. रोहित शर्मा तर तीन वेळेस डबल हंड्रेड केले. त्यात एक वेळी तर नाबाद २६४ धावा करून रेकॉर्ड बनविला. प्रत्येक रात्री झोपताना सकाळी उठू की नाही याची खात्री नसते. तरीही आपण अलार्म लावतो. कारण विश्वास असतो की सकाळी मी उठणारच. याला म्हणतात विश्वास. हे सर्व विश्वासामुळेच घडत असते म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा जीवनात यशस्वी व्हा.
वनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
