२५.कृत्रिम बुद्धिमत्ता : Al – Artificial Intelligence
आपल्याकडे जेसीबी, पोकलेन आले. ते प्रचंड काम लवकरात लवकर आणि कमी पैशात करायला लागल्याने अनेकांचा रोजगार बुडाला. तुम्ही आता अशा युगात प्रवेश करीत आहात, याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत. याला कारण आहे AI. ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी माणसाचे विचार आणि भावना समजून माणसासारखेच काम करते. नव्हे माणसापेक्षाही जास्त विचार करून योग्य निर्णय घेते.
AI हा आता आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनत आहे. काही वर्षांपूर्वीचे सीडी, डीव्हीडी, फ्लॉपी, पेजर, वाकमन याचा वापर आपण केला होता. यापैकी एकही आज शिल्लक नाही. हे सर्व एआयमुळेच. एप्पल फोन मधील सिरी ही आपल्याशी बोलू शकते. टेसला कारला ड्रायव्हर नसतो तरी ती पुढे ट्रैफिक जाम असेल तर दुसरा मार्ग शोधून नियोजित ठिकाणी सेफली घेऊन जाते. अलेक्सा ही आपल्या घरातील लाईट, पंखे चालू बंद करते. आता येत्या काही वर्षांत तुमच्या हातात असलेला सर्वात महत्त्वाचा मोबाईल पण राहणार नाही. त्याऐवजी तुमच्या हातात एक स्मार्ट वॉच म्हणजे घड्याळ असेल. त्यामधील स्मार्ट कार्डद्वारे मोबाईलच्या दहापट जास्तीची कामे हे स्मार्ट बाँच करणार आहे. आजही अनेक लोक एप्पलचे स्मार्ट वॉच वापरत आहेत. या स्मार्ट वॉच मधून, तुम्हाला तुमच्या हार्टबीट, कॅलरीज कळतील. तेच तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असणार आहे. तो तुमचा पर्सनल असिस्टंट म्हणून तुमचा एक नंबरचा सल्लागार असणार आहे. तुम्ही जे सांगाल ते काम तो २४ तास न थकता करणार आहे कारण ते मशीन आहे. तोच तुमचा डॉक्टर आणि वकील म्हणूनही काम करणार आहे.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
