२५.कृत्रिम बुद्धिमत्ता : Al – Artificial Intelligence
याच ए आय च्या माध्यमातून आता गुगलचे खूप सुधारित वर्जन म्हणून CHAT GPT आलेले आहे. याचे जनक जाफरोहिटन आहेत. GPT म्हणजे जनरेटेड प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. या CHAT GPT आणि गुगलमध्ये फार मोठा फरक आहे. गुगलमध्ये जी माहिती फीड केली जाते त्या आधारेच उत्तर देतो. पण चाट जीपीटी कडे असलेल्या माहितीच्या आधारे त्यावर स्वतः विचार करून तो उत्तरे देतोय. त्याला भावना पण असतील. तुम्ही रजनीकांतचा २०१० मध्ये आलेला रोबोट सिनेमा पहिलाच असेल. त्यामधील चिट्टी नावाचा रोबोट जसे रजनीकांत सांगतो तसेच काम करतो. पण रजनीकांतचे ऐश्वर्या राय बरोबरचे प्रेम पाहून तोही तिच्यावर प्रेम करायला लागतो. म्हणजे त्यालाही भावना समजू लागल्या. अलीकडे अनेक हॉलीवूड सिनेमे याच ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू लागले आहेत. हा चॅट जीपीटी तुमच्यासाठी अनेक कामे करतो तो पीपीटी बनवतो, मुलाचा होमवर्क घेतो, पत्रकारापेक्षा चांगली बातमी तो स्वतः लिहू शकतो. त्याची स्पीड भयानक आहे. तुम्ही त्याला कोणत्याही विषयावरचा निबंध ५०० शब्दांत लिहायला सांगितला तर तो एका मिनिटात अतिसुंदर असा निबंध लिहून देतो. या चॅट जीपीटीचे फायदे खूप आहेत. त्यामुळे त्याचा वापरही फार होऊ लागला आहे. यू ट्यूबला दहा लाख युजर होण्यासाठी आठ महिने लागले तर चाट जीपीटीला दहा लाख युजर व्हायला फक्त पाचच दिवस लागले.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
