जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू
६. Communication skill : संवाद कौशल्य
चांगला नेता यशस्वी नेता होण्यासाठी तुम्हाला चांगल भाषण ठोकता नव्हे करता आलं पाहिजे. चांगल भाषण म्हणजे कवीता वाचन नव्हे तर चांगलं संवांद कौशल्य होय. चांगलं संवाद कौशल्य म्हणजे काय तर चांगला विषय चांगल्या लोकांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येण्याचं कौशल्य. केव्हा कोठे काय आणि कोणाशी ते ही कसे बोलावे हे ज्याला कळत तोच प्रसंगावधान राखून बोलणारा माणूसच यशस्वी नेता होतो. हे चांगलं संवाद कौशल्य वाद मिटवणारं असू शकतं तसेच एखादा वाद निर्माण करणारही असू शकतं. हल्ली तर वाद निर्माण करु शकणारा भाषणबाज माणूसच नेता समजला जातो हे हल्लीचं सत्य नाकारता येत नाही. तर आपलं व्यवसायिक संवाद कौशल्य म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या अनुयायांना ज्या सूचना किंवा आदेश द्यायचे असतात ते स्पष्टपणे देता आले पाहिजेत जेणेकरुन त्यांना ते स्पष्ट कळतील आणि तशी त्यांना अंमलबजावणी करता येऊ शकेल. तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने सांगताल तेवढ्या चांगल्या पद्धतीने अनुयायी किंवा कार्यकर्त्याना तो विषय कळला तर मग तसाच निर्णयही चांगल्या प्रकारे राबविला जातो आणि मगच तुम्ही नेता म्हणून यशस्वी होता.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
