७. Coach and guide : प्रशिक्षक आणि मार्गदर्शक
एक चांगला नेता याची आणखी एक महत्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तो आपल्या सहकाऱ्यासाठी coach आणि guide सुद्धा असतो. तो फक्त नेता नसतो. तुम्ही चांगले भाषण केल्यावर काम संपत नाही तर सुरु होते. आता त्या कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम बाकी असत तेव्हा तुम्ही त्यांना दिशा दिली पाहिजे. कार्यकर्त्यांना चांगली दिशा देण्यासाठीच तुम्ही त्याचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक होणं आवश्यक असतं. प्रशिक्षण देणे कोचींग करण म्हणजे काय तर तुम्ही कार्यकर्त्याना कोणतं काम कोणत्या पद्धतीने केलं जाईल हे शिकवणं होय. तर मार्गदर्शक म्हणून तुम्ही त्या कार्यकर्त्यांना शहाणपणाचे सल्ले दिले पाहिजेत. अर्थात ते मागतील तेव्हा एकवेळ आणि जेव्हा सल्ला दिला गेला पाहिजे असे तुम्हाला आवश्यक वाटते तेव्हाही.
बघा म्हणजे चांगला नेता व्हायचं तर चांगले भाषण करायचं कार्यकर्त्यांना चेतवायचं आणि पुढे ते काम कसं करायच हे दाखवून सुद्धा द्यायच आणि तरीही काही कमी पडले तर मार्गदर्शन करुन ते काम पूर्णच करुन घ्यायचे म्हणजे तुम्ही नेता होताल. बेताल होताल तर भैताडच राहताल. नेता कसले होताल ?
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
