७. Coach and guide : प्रशिक्षक आणि मार्गदर्शक
म्हणजेच काय तर तुम्ही कार्यकर्त्याना जेथे जायचे ते सांगणे म्हणजे भाषण करणे. कसे जायचे हे शिकवण आणि तरीही काही कमी पडत असेल तर मग तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्यांना guide करुन तेथे पोहोचवायचेच तरच तुम्ही नेता होणार. फक्त सुरुवात करुन भागत नाही तर शेवटही करावा लागतो. मग तो मुद्दा असो की प्रश्न असो कि एखादी नवीन संकल्पना असो. तुकाराम महाराज हेच सांगतात ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
जसे भाषण देतो तसे वागतो तोच माणूस लोकांच्या आदराला प्राप्त होतो हे व्यवस्थापन तत्व आपल्या कॉलेजात न गेलेल्या पूर्वजांना कळतं आणि आपण दोनदा कॉलेजात जाऊन म्हणजेच Double graduate होऊन आपल्याला अजूनही शिकावं लागतंय. कारण आम्ही वास्तव शिक्षण देणाऱ्या निसर्गाच्या अनुभवरुपी विद्यापिठात कधी प्रवेशच करत नाही. जगाच्या अनुभवरुपी विश्वात यशस्वी होण्यासाठी इतिहास काळातील अभ्यास त्यासाठीच तर महत्वाचा आहे. नियम साधा सोपा आणि सरळ आहे. पुढच्याच ठेव मागचा शहाणा. भूतकाळातील अनुभव गाठीशी बांधा. वर्तमानाची शिदोरी सोबत घ्या आणि भविष्याचा वेध घ्या.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
