८. Proper judgement : योग्य निर्णय
या देशात आयुष्यात एकदाही निवडणूक न लढविता मुख्यमंत्री अगदी प्रधानमंत्रीसुद्धा होता येतं हे लक्षात ठेवा. मनमोहक काम करा आणि सिंग इज आलवेज किंग व्हा! नव्हे किंग मेकर व्हा ! परंतु तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याना मात्र निवडणूक लढवायला लावलीच पाहिजे. कारण ते पडले तरी तुमचा पक्ष वाढीस लावून पडतील असे अनेक पडणारे पडता पडता तुमचा पक्ष सावरुन जातील. म्हणून पक्षात नेहमी Incoming free ठेवा आणि outgoing उपद्रव मूल्य मात्र नियंत्रणात ठेवा आणि outgoing शक्यतो बंद ठेवा. अहो तुम्ही जर कार्यकर्त्याला न्याय दिला तर तो तुम्हाला सोडून कशाला जाईल. थोडक्यात काय तर योग्य निर्णय म्हणजे कार्यकर्त्याना तयार करणे सोबत ठेवणे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाच मूल्यमापन व्यवस्थीत करणं.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
