२९.लीडर्स बना आणि नेतृत्व करा !

२९.लीडर्स बना आणि नेतृत्व करा !

लीडर आणि फॉलोवर मध्ये काय फरक असतो, तेही समजून घ्या. एके काळी बाटा कंपनीने आपल्या बुटांचा प्रसार करण्यासाठी एक लीडर आणि एक फॉलोवर दक्षिण आफ्रिकेतील दोन भागांत पाठविले. जो फॉलोवर होता त्याने एक महिना सर्वे केला आणि कंपनीला कळविले की, आफ्रिकेतील लोक खूपच मागासलेले आहेत. इथे कुणीही पायात साधी चप्पल पण घालत नाही. म्हणून इथे आपल्या बुटाची विक्री होऊ शकत नाही. पण जो दुसरा हाडाचा लीडर होता, त्याने तेथील लोकांशी ओळख वाढविली. त्यांना बुटाचे फायदे सांगितले. बूट घातल्या नंतर खडे, काटे टोचत नाहीत. तळपाय मऊ आणि मुलायम राहतात. आपला रुबाब वाढतो. असे सांगून ५/१० लोकांना फुकट बूट देऊन गावात फिरायला सांगितले. लोकांनी विचारले हे काय आहे? कुठे मिळते? तर माझे नाव आणि पत्ता सांगा. या विचाराने १०० बुटांचा बॉक्स १५ दिवसांत विकला आणि त्याने कंपनीला रिपोर्ट दिला. की आता इकडे बूट पाठवू नका. तर इथे बुटाची फॅक्टरीच उघडा. कारण इथे १०० टक्के मार्केट आपलेच आहे.

लीडर हा नेहमी, दूरदृष्टीचा, ध्येयवादी, आत्मविश्वास असलेला, स्वयंशिस्तचा, नियोजन बद्ध असलेला, निर्णय घेण्याची क्षमता असलेला, धैर्यवान आणि प्रेरणादायी असलेला असतो. लीडरमध्ये व्यवस्थापन कौशल्य, आणि संभाषण कौशल्य असते. अपयशाचा स्वीकार करणारा आणि आधी केलं मग सांगितले या विचाराचा लीडरच हा सर्वोत्तम लीडर बनतो. तुम्हीही हे गुण आत्मसात करा आणि लीडर बनवून सर्वांचे नेतृत्व करा आणि जीवनात यशस्वी व्हा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!