३३.चुकांचा स्वीकार करा !

३३.चुकांचा स्वीकार करा !

जो चुकतो तो माणूस, आणि जो चुका सुधारतो तो देव माणूस. म्हणूनच असे म्हणतात शहाणी माणसे चुका करतात, आणि मूर्ख माणसे चुकांची पुनरावृत्ती करतात. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवितो, तेव्हा आपण आरसा फोडत नसतो. तर तो डाग साफ करतो. तसेच जेव्हा एखाद्याने आपली चूक दाखवून दिली तर, त्याची साथ सोडायची नसते. तर ती चूक सुधारायची असते. यश आणि अपयश, सुख आणि दुःख, गरिबी आणि श्रीमती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जिथे यश असते तिथेच अपयश असते. तुम्हाला जीवनात तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर, सर्वप्रथम ठरवून टाका की अपयशाला घाबरायच नाही. जगात जे जे लोक तुफान यशस्वी झाले असतात, त्यानी अनेक अपयश पचविले, म्हणूनच ते यशस्वी झाले. दुरून आपल्याला त्याचे यशच दिसते अपयश नाही. आणि आपण म्हणतो की काय नशीबवान आहे.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!