३६.गरीब विरुद्ध श्रीमंत
सुप्रसिध्द लेखक नेपोलियन हिल यांच्या ‘थिंक अॅण्ड ग्रो रिच’ या पुस्तकात पुस्तकात माणूस विचाराने श्रीमंत होतो, हा सिद्धांत मांडला गेला आहे. १) गरीब लोक हे नेहमी दुसऱ्याला दोष देतात तर श्रीमंत दोष स्वतःकडे घेतात. २) गरीब लोक श्रीमंतांचा व्देष किंवा मत्सर करतात तर श्रीमंत लोक अतिश्रीमंतांना आदर्श मानून त्याचा पुरस्कार करतात. ३) गरीब लोक नॉन प्रॉडक्टिव्ह गोष्टींवर कर्ज घेऊन गरीब होतात; तर श्रीमंत लोक प्रॉडक्टिव्ह कारणासाठी कर्ज घेऊन अधिक श्रीमंत होतात. ४) गरीब लोक नवीन विचार, नवीन ज्ञान घेणे बंद करतात तर श्रीमंत लोक नेहमी नवनवीन गोष्टी शिकून स्वतःला अद्ययावत करून घेतात. ५) गरीब लोक करमणूक, क्रिकेट, राजकारणात वेळ घालवितात; तर श्रीमंत लोक कामावर लक्ष केंद्रित करतात आणि अधिक श्रीमंत होतात. ६) गरीब पैसे मिळविण्यासाठी काम करतात तर श्रीमंत पैशालाच कामाला लावतात. ७) गरीब एकाच उत्पन्नावर अवलंबून असतात तर श्रीमंत उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण करतात. ८) गरीब, गरीब लोकांच्या सहवासात असतात तर श्रीमंत हे यशस्वी उद्योजक, सी.ए., वकील, बँकर्स यांच्या सान्निध्यात असतात. ९) गरीब म्हणतात हे विकत घेण्याची माझी ऐपत नाही तर श्रीमंत म्हणतात मला विकत घ्यायचे आहे. १०) गरीब म्हणतात मी दुनिया पाहिली आहे, मला सगळे येते. आता शिकण्याची गरज नाही. तर श्रीमंत सतत शिकण्यासाठी, ट्रेनिंगसाठी खर्च करतात. ११) गरीब त्यांच्या मुलांना म्हणतात खूप अभ्यास कर म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल. तर श्रीमंत आपल्या मुलांना म्हणतात खूप अभ्यास कर म्हणजे तू एखाद्या कंपनीचा मालक होशील. यावरून हे लक्षात येईल की, विचाराची पातळी मोठी करून त्याप्रमाणे वाटचाल केल्यास श्रीमंतीचे माप पदरात पडत असते.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
