३७. वेळ संपत आली आहे..

३७. वेळ संपत आली आहे..

पृथ्वीवर पैसा भरपूर आहे कारण तो मानवनिर्मित आहे. पण वेळ ही मानवनिवनिर्मित नाही म्हणून पैशापेक्षाही बेळेला महत्त्व असते. म्हणूनच म्हणतात Time is money नव्हे तर Time is more, more than money. कारण पैसे उधार, कर्जावर, भीक मागूनही मिळविता येतील. पण एकदा गेलेली वेळ परत कधीच येणार नाही. म्हणूनच वेळेचे महत्त्व पैशापेक्षाही खूपच जास्त आहे. दुर्दैवाने भारतीय लोकांना वेळेचे महत्त्व न समजल्यानेच ते म्हणतात. चलता है! हा Indian Time आहे. लग्न कार्यात, इतर कार्यक्रमात २-२, ३-३ तास उशीर करतात. किती Time, किती Man power, कामाचे तास वाया जातात, याचा कधीतरी विचार करता का? आपल्या या दुर्गुणावरून परदेशांतील लोक आपली चेष्टा करतात. बरेच लोक म्हणतात मला थोडा जास्त वेळ मिळाला असता तर मी हे काम, ते काम करू शकलो असतो पण… पण, वेळ निघून गेली.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!