१०. Administrative skill : प्रशासकीय कौशल्य
१. योजना बनवा.
जगात कोणीही कल्पना केलेली नसेल तो विषय संकल्पना जगात कोणाच्याही मेंदूत आकार घेण्यापूर्वी तुमच्या डोक्यातून ती संकल्पना अस्तीत्वात उतरावयाला सुरुवात करा. मग ही गोष्ट विज्ञानातील असो, सामाजिक क्षेत्रातील असो किंवा राजकीय क्षेत्रातील असो अशी नवीन कल्पना युक्ती लढवा की जगाने तोंडात बोट घातले पाहिजे. मोठमोठ्या विद्वानांना धक्का बसला पाहिजे. अनेक लोकांनी ती कल्पना ऐकल्यावर तुम्हाला तात्पुरतं वेडा मुर्ख म्हटलं तरी चालेल पण तुम्ही तुमच्या कामात गर्क रहायचे. थोडक्यात काय तर भन्नाट शक्कल लढवून अफाट श्रीमंत व्हा, यशस्वी व्हा. लक्षात ठेवा जग नेहमी नवीन गोष्टींना डोक्यावर घेतं आणि नवीन कल्पना राबविणाऱ्यांना आपला नेता मानतं.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
