जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

११. Discipline शिस्त

तुम्हाला यशस्वी नेता व्हायचं ना मग शिस्त पाळायला शिका. स्वतः शिस्त पाळा लोक आपोआप धडा गिरवतील. आपण आपल्या शिस्तप्रिय वागण्यातून लोकांना आदर्श घालून द्या. लोकांना दिलेला वेळ पाळा. ११ ची वेळ असेल तर १०.५० लाच पोहचा तशीरा जाण्याची सवय लावून घेताल तर बारा वाजायला वेळ लागत नाही. विमान तुम्ही लेट झालात म्हणून थांबत नाही. रेल्वे तुम्ही येईपर्यंत तुमची वाट पाहत नाही आणि लक्षात सेवा संधी कधीही पहिले पोहोचणाऱ्याच्या गळ्यात माळ घालते, श्रीमंत माणसं आणि मोठे झालेले नेते या दोघांच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समान सापडेल आणि ती म्हणजे शिस्तपालन, शिस्तीमुळे नेता स्वतः त्या कामाबाबतीत Dedicated असल्याच त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना सहज कळते आणि लोकांना त्यातून न बोलता, न सांगता प्रेरणा मिळते जी एक चांगले लांबलचक भाषण देऊन किंवा महागडी मेजवानी देऊनही शक्य नसते. लोकांना बेशिस्त होऊ द्यायचे नसेल तर एकच काम करा स्वतः शिस्तपूर्वक रहा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!