३७. वेळ संपत आली आहे..

३७. वेळ संपत आली आहे..

जीवन आपल्याला कधीच काही देत नसते, तुम्ही जे द्याल तेच परत मिळते. पेराल तेच उगवेल. यशस्वी व्यक्ती कमीत कमी वेळात जास्तीतजास्त आऊटपुट काढतात हे टेक्निक ज्याला समजले तेच यशस्वी होतात. वेळेचे व्यवस्थापन कसे करू शकतो तर तुम्हाला फोन करायला वेळ नाही तर ड्रायव्हर गाडी चालवतोय तुम्ही फोनवर बोलू शकता. बँकेची कामे किंवा तिकीट काढायचंय, तुम्ही चालत जाऊन वेळ खर्च करण्यापेक्षा ऑनलाइन काढा. हाय युटिलिटी म्हणाने महत्त्वाच्या कामाला तुम्ही स्वतः जास्त वेळ द्या. आणि लो युटिलिटी, म्हणजे कमी महत्त्वाच्या कामाला कमी वेळ द्या. तुमच्या कामाची विभागणी करा. योग्य व्यक्तीवर जबाबदाऱ्या सोपवा. आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री, मोठे उद्योजक, आयएएस, आयपीएस यांना प्रचंड कामे असतात. ते कामाची
विभागणी करून, छोटी छोटी कामे दुसऱ्याकडून करवून घेतात. स्वतःच सर्व काम करण्याचा अट्टहास करीत नाहीत. यशस्वी लोक त्यांच्या पैशाची आणि वेळेची योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात म्हणूनच ते यशस्वी होतात. खरोखरच वेळ संपत आली आहे म्हणून तुम्हीही तुमच्या वेळेची बचत करून जीवनात यशस्वी व्हा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!