जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

१२. Patience : संयम

यशस्वी नेता व्हायचे आहे ना मग सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा नियम लक्षात ठेवा तुम्ही संयम कधी सोडता कामा नये, संयम सुटला नेतृत्व संपले. योग्य निर्णय घेण्यासाठी काही काळ वेळ जावा लागतो आणि त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक. घाईघाईत घेतलेला निर्णय बऱ्याचदा चुकीचा ठरतो म्हणून व्यवस्थीत निर्णय घ्यावा.

चांगला नेता होण्यासाठी आणखी एका ठिकाणी संयम पाळायला शिका. लोक तुमच्या बरोबर बोलत असताना तुम्ही ते संयमाने ऐकून घ्या. त्याचे विचार त्यांची मत जाणून घ्या. त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घ्या. ते विचार ती मते त्या तक्रारी तुम्हाला किती सहज रास्त वाटतात ते मनात ठेवा लगेच व्यक्त करण्याची घाई करु नका. मुद्दा पटला तरी लगेच प्रतिक्रिया देणं टाळा आणि मते न पटणारी असतील तर बघतो सांगतो असं म्हणून वेळ मारुन न्या. विचार करा आणि मगच निर्णय घ्या. किंवा द्या. संयम हा पतंगाच्या मांज्यासारखा असतो. जोपर्यंत मांजा हातात तोपर्यंत नेतृत्वाची पतंग ताब्यात. मांजा हातातून सुटला तर पतंग हातातून निसटलीच समजा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!