नेतृत्वाच्या जगमान्य पद्धती

३. Consultative style: सल्लागार पद्धती

नेतृत्वाची ही पद्धत अतिशय प्रगत म्हणावी अशी आहे. नेता कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करतो. नेत्याला असं वाटत की आपल्या सहकाऱ्यांनाही काहीतरी कळते आणि म्हणून तो त्यांना विचारात घेतो. त्याचे विचार जाणून घेतो. अशा पद्धतीचा नेता मनमोकळा संवाद करुन सहकारी मंडळीच्या सूचना सल्ला याची दखल घेतो आणि त्यामुळे निर्णय घेताना तो आदेश देत नाही तर सूचना देतो त्यामुळे एक आपुलकीची भावना त्यात सामील असते आणि अंमलबजावणीही तेवढ्याच तत्परतेने होत असते.

या पद्धतीत नेत्याचा फायदा असा की सहकाऱ्यांनी दिलेला सल्ला मानणं त्याला बंधणकारक नसतं. महाराज नेहमी मंत्रीमंडळाशी सल्लामसलत करत परंतु निर्णय आपल्याला पटेल तोच घेत असत. अर्थात घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं श्रेय किंवा जबाबदारी नेत्यावरच असते आणि नेता ती टाळतही नाही. जेव्हा सहकाऱ्यांची मतं जाणून घेणं आवश्यक आहे त्यावेळी ही पद्धत अत्यंत चांगली असते. सहकाराभिमूक निर्णय या पद्धतीने घेतले जातात.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!