३९.कौशल्य डेव्हलप करा : Skill
सध्या देशात रिकाम्या हाताला काम नाही व कामासाठी योग्य हात म्हणजे स्किल्ड मॅनपॉवर मिळत नाही. म्हणून बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. स्किल म्हणजे कला किंवा कलाकारी. ज्ञानाचा सराव केल्यास स्किल वाढते. All business skills are learneable. इंजेक्शन देण्याचे स्किल डॉक्टर पेक्षा नर्सकडे जास्त असते. तर बंद पडलेली गाडी दुरुस्त करण्याचे स्किल इंजिनिअर पेक्षा फिटर कडे जास्त असते. कारण त्यांची प्रॅक्टिस जास्त असते. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर हार्ड स्किल बरोबर सॉफ्ट स्किल शिकावेच लागेल. त्यामधील महत्त्वाचे स्किल्स म्हणजे टाईम मॅनेजमेंट स्किल, कम्युनिकेशन स्किल, लीडरशिप स्किल, मॅनेजरियल स्किल, त्याचबरोबर वाचण्याची, ऐकण्याची, लिहिण्याची व बोलण्याची कला शिकणे गरजेचे असते. सध्याच्या युगात तर डिजिटल मार्केटिंग स्किल, ग्राफिक डिझायनिंग स्किल, व्हिडिओ एडिटिंग स्किल, कोडिंग स्किल व टॅली अर्थात अकाउंट रायटिंग स्किल महत्त्वाचे स्किल्स आहेत. आजच्या तरुणांनी व विद्यार्थ्यांनी यामधील त्यांच्या आवडीचे स्किल्स डेव्हलप केल्यास त्यांना चांगला जॉब मिळू शकतो, किंवा स्वतःचा स्टार्टअप, उद्योगही सुरू करता येऊ शकतो. म्हणून म्हणतात यशासाठी विल बरोबर स्किल ही जरुरी असते. ते स्किल डेव्हलप करा व जीवनात यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
