४१ .योग्य निर्णय घ्यायला शिका
चुकीच्या निर्णयामुळे नव्हे तर निर्णयच न घेतल्याने ९० टक्के लोक साधारण जीवन जगत असतात. ३१ वर्षांपूर्वी सन १९९२ मध्ये मी स्टेट बँकेची ११ हजार रुपये पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, तो माझ्या जीवनातील सर्वात अवघड निर्णय होता, कारण ९५ टक्के लोकांनी मला नोकरी सोडू नको असाच सल्ला दिला. पण माझे सासरे जाधव साहेब यांनी योग्य निर्णय कसा घ्यावा, याचा फॉर्म्युलाच मला सांगितल्याने माझा निर्णय योग्य ठरला. त्यांनी सांगितले होते, की जीवन जगत असताना. आपल्याला वेळोवेळी लहान मोठे निर्णय घ्यावेच लागतात. पण मोठे निर्णय घेताना, त्याचे फायदे तोटे, मेरिट्स व डिमेरिट्स तपासावे लागतात.
अशावेळी फायदातोट्याचे महत्त्वाचे पाच प्रश्न तुम्हीच निर्माण करा. त्याचे त्रयस्थपणे उत्तरेही तुम्हीच द्या. २० मार्वांना १ प्रश्न याप्रमाणे शंभर मार्कापैकी ५१ टक्के किंवा जास्तीचे गुण ज्या बाजूने असतील तोच निर्णय घ्या व घेतलेला निर्णय तडीस न्या. आपण घेत असलेल्या निर्णयाबद्दल त्याच क्षेत्रातील जाणकार व योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. महाभारतात पांडवांनी श्रीकृष्णाचा सल्ला घेतला म्हणून ते जिंकले व शकुनीच्या सल्ल्यानेच कौरव हरले. म्हणून आपला सल्लागार महत्त्वाचा असतो.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
