४३ ऑनलाईनचा फंडा, छोठ्या व्यापाऱ्यांना गंडा
आतापर्यंत आपणच एक दुसऱ्याचे सामान खरेदी करुन बाजार चालवित होतो. ऑनलाइन खरेदी करून आपण भले ५०, १०० रुपयांची बचत करु पण सर्व नफा मोठ्या आणि परदेशी कंपन्यांनाच मिळणार. या कंपन्या बाजारातील खूप मोठ्या भागावर कब्जा करून बेरोजगारी निर्माण करीत आहेत. यामुळे छोटे दुकानदार, व्यापारी यांचे खूप नुकसान होत आहे. जर आपण विचार करत असाल की, मी दुकानदार नाही, मी तर नोकरी करतो, ऑनलाइन खरेदीने माझा वेळ आणि थोडाफार पैसाही वाचतो. तर ती मोठी चूक आहे. कारण समाजात जेव्हा आर्थिक असमानता वाढते किंवा देशातील पैसा देशाबाहेर जातो तेव्हा देशातील प्रत्येक व्यक्तिला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपात नुकसान सहन करावेच लागते, मग तो गरीब असो अथवा श्रीमंत, नोकरीवाला असो किंवा दुकानदार. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे ऑनलाइन खरेदीवर बंदी आणता येत नाही. आपण डिस्काउंटच्या आशेने ऑनलाईन किंवा मोठ्या मॉलमधून खरेदी करतो.
यातून ठराविक व्यक्ती किंवा संस्था श्रीमंत होते. पण जेव्हा आपण अनेक किरकोळ दुकानदारांकडून खरेदी करतो तेव्हा आपल्या थोड्याश्या नफ्याने अनेक घरातील कुंटुंबांची जेवणाची व्यवस्था होत असते. आपण ज्या समाजात राहतो त्यातील प्रत्येकानेच आपल्या समाज बांधवांची काळजी घेतली पाहिजे. थोडा स्वार्थ बाजूला ठेऊन आपणच एकमेकांना आधार दिला पाहिजे. ते काम आजपासून करू आणि छोट्या व्यापाऱ्यांना सहकार्य करून देशातील पैसा देशासाठीच वापरू.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
