प्रेरणा म्हणजे काय ?

प्रेरणा म्हणजे काय ?

२. प्रेरणा देणं ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे

प्रेरणा ही फक्त एका वेळीच देऊन भागत नाही. प्रेरणा ही सातत्याने द्यावी लागते. माणसाची ईच्छा आकांक्षा याला जर कधी अंत नाही तर प्रेरणेला सुद्धा अनंतकाळपर्यंत पर्यायच असू शकत नाही. माणसाची एक गरज संपूण जर लगेच दुसरी तयार होत असेल सातत्याने एकामागून एक गरजा निर्माण होत असतात तर त्या प्रेरणादायी गोष्टीसुद्धा तशाच एकामागून एक निर्माण व्हाव्या लागतात.

म्हणून यशस्वी नेता किंवा व्यवस्थापक होऊ इच्छीणाऱ्या माणसानं दूरदर्शी राहून भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीचा वेध घेऊन तशा प्रेरणा लोकांना दिल्या पाहीजेत. जर काही धोका, संकट भविष्यात निर्माण होणारे असेल तर त्याही बाबतीत प्रेरणा ही दिली गेली पाहिजे. जर संधीला अंत नाही. संकटाना शेवट नाही तर प्रेरणेलाही अंत नाही आणि पर्याय देखील असू शकत नाही.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!