प्रेरणा म्हणजे काय ?

४. प्रेरणा ही ध्येयवादी असते

जर तुमच्याकडे विशिष्ट ध्येय नसेल तर तुम्ही प्रेरीत नाही असा त्याचा अर्थ होतो. प्रेरणा घेण्यामागे काही उद्देश असतो तसाच प्रेरणा देण्यामागेही काही उद्देश असतो आणि हा उद्देश समोर ठेवला की लोक त्या दिशेने जाणीवपूर्वक काम करु लागतात. लक्षात ठेवा हुशार नेत्याला प्रेरणा लोकासमोर मांडता आली पाहिजे. तुम्ही लोकांसमोर प्रेरणा ठेवा लोक तुमच्यासमोर निकाल ठेवतील. you give them motivation they will give you result अर्थात दोन्ही ठिकाणी Desire या अपेक्षित शब्दाची गरज आहे.

ध्येयाने प्रेरीत होऊन जगणारी लोकंच जीवंत असतात. ज्याच्या आयुष्यात ध्येयच नाहीत ते जीवंत असूनही मेल्यासारखेच आहेत. आणि प्रेरणा न देऊ शकणारा नेताही जास्त काळ जगण्याचा अधिकारी राहत नाही. त्याचे अनुयायी त्याला सोडून जो प्रेरणा देऊ शकतो त्याच्या मागे जातील. लोक तुमच्या मागे यावेत असं वाटत असेल तर त्यांना प्रेरणा द्या. जास्त लोक यावेत असं वाटत असेल तर जास्त प्रेरणा द्या. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत विश्ववंदीता हा शब्द आवर्जून आहे. तो एक प्रेरणा याचा घटकच आहे. मावळ्यांना त्यांच ध्येय दाखविले गेले ते एवढे उदात्त आणि भव्य होते की ते पूर्ण करण्याऱ्या राजमुद्रेवर महाराष्ट्रवंदीता भारतवंदीता हे शब्दच मुळी कमी पडले असते. म्हणून पर्याय ध्येयाची यथार्थ शब्दात मांडणी करताना विश्ववंदीता हा शब्द वापरला गेला.

प्रेरणा या शब्दाची किंमत १६ व्या शतकात महाराजांना माहित होती आणि आज आम्हाला २१ व्या शतकातील लोकांना ती M.B.A करुन धड समजून घेता येत नाही. महाराजांनी प्रेरणा तीही शाश्वत अशी प्रेरणा देणारी राजमुद्रा वयाच्या १२ व्या वर्षी धारण केली आणि छत्रपती हे जगाच्या पाठीवरील पहिले पद सुद्धा शिक्कामोर्तब करताना कागदपत्रावर उमटविले. तेव्हा महाराजांचे वय किती तर १२ वर्षे आणि महाराजांच्या शब्दांनी विचारांनी प्रेरीत होऊन त्यांच्यासोबत काम कराणाराचं वय किती तर ६०-६५.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!