जगमान्य प्रेरणादायी घटक
“Shivaji gave them on this account a good salary and with such punctuality that on the appearance of the new moon (प्रतिपदा) Each one received what had been promised at the time of enlistment” – FOREIGN BIOGRAPHY OF SHIVAJI by Surendra Sen
आता या दैनंदिन किंवा मासिक पगाराव्यतिरिक्त ही लोकांना कधी कधी बोनस द्यायला जरा हात मोकळा ठेवत चला. कर्मचारी, सहकारी यांची तुम्ही दिवाळी न कराल तर तुमचा शिमगा करायला ते कशाची वाट बघतील. म्हणून तुम्ही दिवाळी लक्षात ठेवा ते होळी विसरतील. आणि तुम्हाला जर सर्वात यशस्वी नेता व्यवस्थापक व्हायचं असेल तर पगार आणि बोनस याच्याहीपुढे जाऊन लोकांना काहीतरी Incentive देत चला. आता हे Incentive म्हणजे काय म्हणताल तर ज्यामुळे लोक आणखी उत्साहाने काम करतील त्यासाठी थोडा जास्त पैसा पेरणे, जास्त पैसा पेराल तर नक्कीच जास्त उगवेल. यामध्ये औषधोपचार खर्च, भरपगारी रजा, घरभाडं, शैक्षणिक खर्च, मनोरंजन खर्च यांचा समावेश होतो. लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटावा असं वाटत असेल तर त्यांच्या मनात आपुलकी निर्माण करण्यासाठी हे उद्योग करा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
